करिअरनामा ऑनलाईन । Covid-19 रोग खूप लोकांच्या नोकऱ्या घेऊन गेला. काही लोकांच्या हातचे काम सुद्धा घेऊन गेला. पण काही लोकांनी यामधील संधी हेरली व त्या संधीचे सोने करून त्यांनी आपले व्यवसाय यामध्ये सुरू केले. याच काळात आलेल्या संकटांना संधीमध्ये बदलणारी जमशेदपूरची श्वेता दास ही 21 वर्षाची मुलगी ! या मुलीने 21 व्या वर्षी आपले स्वतःचे डिजिटल ऑनलाइन क्लासचे स्टार्ट-अप सुरू केले. पाच हजार रुपये पासून सुरू केलेल्या या पोर्टलला आज 1000 मुले आणि 30 शिक्षक जॉईन झाले असून ते आज या ऑनलाइन क्लास मार्फत शिक्षण घेत आहेत. ती सध्या महिण्याला 1 लाख रुपये कमावत आहे.
लॉकडाऊनमध्ये सुरुवातीला वर्गातील शिक्षण बंद करण्यात आले होते. त्यामुळे ऑनलाईन क्लासेस हाच एकमेव पर्याय समोर असल्यामुळे अनेक लोकांनी ऑनलाईन क्लासेस सुरू केले. पण फी खूप जास्त असल्यामुळे सर्वांना ते क्लासेस जॉईन करणे शक्य नव्हते. म्हणून ती अडचण ओळखून श्वेता दास हिने सर्वांना परवडेल असे शिक्षण देण्यासाठी एक ऑनलाइन डिजिटल शिक्षणाचे पोर्टल बनवून, नर्सरी पासून ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे पर्याय कमी पैशांमध्ये उपलब्ध करून दिले. यामध्ये आता जवळपास हजार विद्यार्थी आणि शिक्षक तीस शिक्षकांनी रजिस्ट्रेशन केले असून शिक्षणाची फी सुद्धा 300 रुपये प्रति महिने इतकी कमी पासून ठेवली आहे
श्वेता स्वतः जेव्हा या पोर्टल मधून प्रति विद्यार्थी शंभर रुपये अशी कमिशन घेऊन बाकी सर्व शिक्षकांना दिली जाते. त्यामुळे शिक्षकही खूश आहेत आणि विद्यार्थ्यांनाही कमी पैशांमध्ये शिक्षण मिळत असल्यामुळे त्यांनाही सहभागी होण्यास कुठलीही अडचण येत नाही. विविध कंपन्या श्वेता यांना त्यांच्याशी टायप करण्यास निमंत्रित केले आहे पण श्वेता दास यांना हे ऑनलाईन शिक्षणाचे पोर्टल वाढवण्याचा माणस आहे असे ते त्या माध्यमांशी बोलताना म्हणाल्या.
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com