सरकारकडून पुरेसा निधीच उपलब्ध नसल्याने सीबीआयमध्ये 1281 पदे रिक्त

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । सीबीआयमध्ये 1281 पदे रिक्त आहेत. त्यातील सर्वात जास्त 798 पदे कार्यकारी अधिकाऱ्यांची आहेत. सीबीआय मधील रिक्त पदे भरण्यासाठी विलंब झाला असून तपासाच्या गुणवत्तेवर परिणाम व प्रलंबित प्रकरणांची संख्याही वाढेल. त्यामुळे  समितीने रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याची शिफारस केली आहे.

केंद्रीय अन्वेषण विभागावर भ्रष्टाचार तसेच गंभीर गुन्ह्यांचा तपास करण्यावर संसदेच्या समितीने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. राज्यसभेच्या एका समितीने सीबीआयमध्ये रिक्त असलेली पदे, तांत्रिक सुधारणा आणि अर्थसंकल्पातील तरतूद उपलब्ध करण्यात सरकार आणि सीबीआय दोघांनाही सुधारण्याचा सल्ला दिला.

सीबीआयद्वारे अर्थ मंत्रालयाकडे अंदाजे खर्च म्हणून 1386 कोटी रूपये मागितले होते. परंतु अर्थसंकल्पात फक्त 802 कोटी रूपयांची तरतूद केली गेली. गेल्या काही वर्षांत सीबीआयचे काम खूपच वाढले आहे. परंतु आर्थिक तरतूद कमी असल्यामुळे सीबीआयचे प्रशिक्षण, संशोधन, उपकरण आणि इतर गरजांची पूर्तता होणार नाही. त्यामुळे त्याच्या क्षमतेवर प्रतिकूल परिणाम होईल. या परिस्थितीत सीबीआयकडून अपेक्षित परिणामाची आशा करता येणार नाही.सीबीआयला पुरेसा निधी उपलब्ध करून दिला पाहिजे.

नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”