करिअरनामा ऑनलाईन | covid-19 मुळे जगभरात श्रमिक बाजारावर मोठा परिणाम झाला आहे. एका रिपोर्टनुसार याचा अजून मोठा फटका कमी उत्पन्न असणाऱ्या देशांच्या कामगारांवर जास्त पडणार आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात लागत असलेल्या झटक्यामुळे जवळपास एक कोटी 80 लाख लोकांना येत्या दहा वर्षांमध्ये नवीन काम पकडावे लागू शकते, असा रिपोर्ट एका संस्थेने दिला आहे.
मेकिंगजी ग्लोबल इन्स्टिट्यूट या संस्थेच्या रिपोर्टनुसार रिटेल सर्विसेस, हॉस्पिटॅलिटी आणि ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशन अशा जॉबवरती याचा मोठा परिणाम होणार आहे. या सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कमी वेतनावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या रिपोर्टमध्ये असेही म्हटले गेले आहे की, कामकाजामध्ये जे बदल झाले आहे ते भविष्यात तरी स्थिर राहतील. यामध्ये रिमोट वर्किंग सोबत ‘वर्क फ्रॉम होम’ हेही सामील असेल. सोबतच ई-कॉमर्स आणि ई- इंटरॅक्शन याच्यामध्ये वाढ होऊ शकते.
सन 2020 मधील पहिल्या तिमाहीमध्ये वैश्विक स्तरावर श्रमिकांच्या उत्पन्नामध्ये 10.5 टक्के कमी आली आहे. आंतरराष्ट्रीय श्रमिक संघटनाच्या रिपोर्टनुसार कामगारांच्या कामाच्या तासांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोबतच, कामगारांच्या मासिक वेतनावर याचा परिणाम झाला आहे. आयएलओ नुसार, निम्न मध्यमवर्गीय देशामध्ये श्रमिक लोकांचा मासिक आमदनीमध्ये 15.1 टक्के नुकसान झाले आहे. यामध्ये 24.5 कोटी रोजगारामध्ये डायरेक्ट फटका पडला आहे.