करिअरनामा । जागतिक महासागर दिन दरवर्षी 8 जून रोजी जागतिक स्तरावर साजरा केला जातो. हा दिवस आपल्या जीवनात समुद्राचे महत्त्व आणि ज्याद्वारे आपण त्याचे संरक्षण करू शकतो याबद्दल जागतिक जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो.
महासागर दिन 2020 ची थीम आहे :- “इनोव्हेशन फॉर अ सस्टेंबल ओशन”. यातील इनोव्हेशन – नवीनतम पद्धती, कल्पना किंवा उत्पादनांच्या परिचयांशी संबंधित एक गतिशील संज्ञा आहे.
सदर दिवसाचा उद्देश सामान्य लोकांना समुद्रावरील मानवी क्रियांच्या परिणामाबद्दल सांगणे, समुद्रासाठी जगभरातील नागरिकांची चळवळ विकसित करणे आणि जगाच्या समुद्रांच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी एका प्रकल्पात जगाची लोकसंख्या एकत्रित करणे हे आहे. महासागर हे अन्न आणि औषधाचा प्रमुख स्रोत आणि जैवमंडळाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहेत.
जागतिक महासागर दिनाचा इतिहास:
कॅनडा सरकारने जागतिक महासागर दिन ही संकल्पना 1992 मध्ये रिओ दि जानेरो येथे झालेल्या पृथ्वी शिखर परिषदेत प्रस्तावित केली होती. 2008 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेने अधिकृतपणे जागतिक महासागर दिन स्थापित केला. महासागराचे आणि समुद्राचे पाणी वाचवण्यासाठी ‘द ओशन प्रोजेक्ट आणि वर्ल्ड ओशन नेटवर्कच्या’ सहकार्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर हा उत्सव साजरा करण्यास सुरवात केली गेली.
स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे –
संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस: अँटनिओ गुटेरेस.
———————————————————
स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयासाठी आमच्या करीअरनामाच्या परिक्षाभिमुख असलेल्या ‘दिनविशेष व Gk update’ सेक्शन ला भेट देत रहा.
———————————————————-
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 78218 00959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट www.careernama.com व Facebook page करीअरनामाला भेट द्या. करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
✉ [email protected]
———————————————————-