ZP Recruitment 2022 : कम्प्युटरवर टायपिंग येत असेल तर ही नोकरी तुमच्यासाठी; ‘या’ जिल्हा परिषदेत निघाली भरती

करिअरनामा ऑनलाईन। जिल्हा परिषद चंद्रपूर येथे काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची (ZP Recruitment 2022) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. डेटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 सप्टेंबर 2022 आहे.

संस्था – जिल्हा परिषद, चंद्रपूर

भरले जाणारे पद –

डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

  1. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. तसेच उमेदवाराचे Marathi Typing 30 wpm and English Typing 40 WPM पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे.
  3. उमेदवारांनी MSCIT कोर्स केला असावा.
  4. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  5. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

डेटा एंट्री ऑपरेटर – 20,650/- रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

  • Resume
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठी पत्ता – (ZP Recruitment 2022)

शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद चंद्रपूर.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 सप्टेंबर 2022

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिकृत वेबसाईट – https://zpchandrapur.maharashtra.gov.in/mr

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com