ZP Kolhapur Recruitment : कोल्हापूर जिल्हा परिषदेत ‘या’ पदांवर भरती; काय आहे पात्रता? 

करिअरनामा ऑनलाईन। कोल्हापूरमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी (ZP Kolhapur Recruitment) आनंदाची बातमी आहे. जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत विधिज्ञ पदाच्या 26 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2022 आहे.

संस्था – कोल्हापूर जिल्हा परिषद, कोल्हापूर

भरले जाणारे पद – विधिज्ञ

पद संख्या – 26 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – कोल्हापूर

वय मर्यादा – 33 ते 58 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 डिसेंबर 2022

अर्ज पाठवण्याचा पत्ता – उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) जिल्हा परिषद, कोल्हापूर

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (ZP Kolhapur Recruitment )

विधिज्ञ –

1) भारतीय नागरीक असणे आवश्यक.

2) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी

4) वकीली सनद प्राप्त केल्यानंतर कमीत कमी 10 वर्षाचा प्रत्यक्ष वकीली व्यवसायाचा अनुभव असावा.

5) स्थानिक स्वराज्य संस्थेत कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

महत्वाची कागदपत्रे –

  • विधी शाखा पदवी प्रमाणपत्र
  • बार कौन्सिल सनद मिळालेची प्रत
  • वकीली व्यवसायाच्या अनुभवाबाबत स्थानिक बार कौन्सिलचे प्रमाणपत्र
  • वयाच्या पुराव्यासाठी माध्यमिक शाळा उत्तिर्ण प्रमाणपत्र किंवा इतर समकक्ष पुरावा.

असा करा अर्ज –

  1. वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
  3. तसेच अर्जाच्या लिफाफ्यावर कोणत्या स्तरावरील न्यायालयासाठी अर्ज केला आहे ते स्पष्टपणे नमूद करणेत यावे.
  4. टपालाव्दारे पाठविण्यात येणारे अर्ज हे सदर (ZP Kolhapur Recruitment ) अंतिम तारखेपर्यंत प्राप्त होतील तेच स्विकारणेत येतील
  5. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
  6. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  7. अर्जाचा नमुना व इतर माहिती zpkolhapur.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
  8. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2022 सांयकाळी 5.00 वा. पर्यंत स्विकारणेत येतील.
  9. विहीत मुदतीनंतर येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स -law

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 

अधिकृत वेबसाईट – zpkolhapur.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com