गडचिरोली जिल्हा परिषदेत ४२ पदांसाठी भरती

गडचिरोली म्हटलं की बर्याचदा भल्या भल्या शासकीय अधिकार्यांना पाचावर धारण बसते. नक्षली कारवायांमुळे गडचिरोली जिल्हा नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. मात्र अलीकडच्या काही काळात परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाली आहे. प्रशासकीय अधिकारी म्हणुन काम करत असताना आपल्या कामाचा ठसा उमटवण्याची संधी येथे अधिकार्यांना मिळते असल्याने अनेकजण आता गडचिरोलीत काम करण्यास उत्सुक असतात. वैद्यकियदृष्ट्या गडचिरोली अतिशय मागास असून चांगल्या सरकारी डाॅक्टरांची जिल्ह्याला गरज आहे. तुम्हाला गडचिरोलीत वैद्यकीय अधिकारी म्हणुन काम करायचे असेल तर तुमच्यासाठी एक खूषखबर आहे. जिल्हापरिषद गडचिरोली मधे नुकतीच ४४ जागांसाठी भरती जाहिर झाली आहे. अधिक माहिती खालीलप्रमाणे –

एकुण जागा – 44

पदाचे नाव –

वैद्यकीय अधिकारी (सामान्य रुग्णालय/उपजिरु व ग्रामीण रुग्णालय): 12 जागा

वैद्यकीय अधिकारी (प्राथमिक आरोग्य केंद्र): 32 जागा

शैक्षणिक पात्रता – B.A.M.S व विशेषज्ञ पदासाठी पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा.

वयाची अट – 58 वर्षांपर्यंत

थेट मुलाखत – प्रत्येक महिन्याचा 2रा व 4था सोमवार (12:00 ते 03:00 PM)

मुलाखतीचे ठिकाण – जिल्हा शल्यचिकित्सक, सामान्य रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली

नोकरी आणि करिअर संबंधी अपडेट्स मिळवण्याकरता आजच आमचा WhatsApp आणि Telegram चॅनल जाॅइन करा.

WhatsApp ग्रुपल जाॅइन व्हा
Join WhatsApp Group

आमचा Telegram चॅनल जाॅइन करा
Join Telegram