झिंगानूर गावाची कन्या बनली माडिया जमातीतील पहिली महिला डॉक्टर

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । जो गडचिरोली जिल्हा कायम नक्षलवाद्यांच्या दहशतीखाली असतो  त्याठिकाणी शिक्षणाची वानवा असणार ..! अशा अतिदुर्गम भागातील माडिया जमातीतील डॉ. कोमल मडावी हिने एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करून पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान मिळविला आहे.

कोमल मडावी ही झिंगानूर या गावाची आहे. झिंगानूर गाव गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून अडीचशे, तर सिरोंचा तालुका मुख्यालयापासून ६० किमी अंतरावर असलेले आदिवासी, अविकसीत गाव म्हणून ओळखले जाते. येथील शेतकरी असलेले कासा मडावी आणि त्यांची पत्नी असलेली आरोग्यसेविका श्यामला नागुला यांची मुलगी.

ज्या भागात बस जात नाही , लाईटची सोय नाही , इंटरनेट नाही अशा परिस्थितीत डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणारी कोमल मडावी हिची गोष्ट खरचं प्रेरणादायी आहे. गावात आरोग्याच्या सोई उपलब्ध नाहीत. तिची आई आरोग्य विभागात कार्यरत असल्यामुळे  त्यांना अशा भागातल्या परिस्थितीची कल्पना होती. त्यामुळे आपल्या मुलींनी डॉक्टर बनावे, अशी कोमलच्या आई  यांची इच्छा होती. कोमलने आपल्या आईची इच्छा पूर्ण करून पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवला.

हे पण वाचा -
1 of 10

डॉ. कोमल मडावी हिने वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथून  एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करून डॉक्टरची पदवी घेतली. ‘आता डॉ. कोमलने पी. जी. करावे, अशी इच्छा तिच्या आईने बोलून दाखविली.

नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: