Zilha Parishad Bharti 2022 : राज्यातील जिल्हा परिषदांमधील रखडलेली पदभरती लवकरच होणार? 13,521 पदे भरली जाणार…

करिअरनामा ऑनलाईन । फडणवीस सरकारच्या काळात राज्यात मेगाभरतीची घोषणा करण्यात आली होती. (Zilha Parishad Bharti 2022) त्यात जिल्हा परिषदेमधील 13 हजार 521 जागांचा समावेश होता. यासाठी मार्च 2019 मध्ये 20 लाखांवर अर्ज प्राप्त झाले होते. तांत्रिक कारणांमुळे ही भरती प्रक्रिया रखडली होती. आता भरती लवकरच होणार असल्याची माहिती ग्रामविकास व पंचायत राज विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सामान्य प्रशासन विभागाने भरतीसाठी परवानगी दिली असून शासनाने नव्याने नेमलेल्या तीन कंपन्यांपैकी एकाची परीक्षेसाठी निवड करावी, अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे ग्रामविकास व पंचायत राज विभाग लवकरच एका कंपनीची निवड करून भरती प्रक्रियेला सुरुवात करणार आहे.

हे पण वाचा -
1 of 384

महापरीक्षा संकेतस्थळ बंद झाल्याने पुढे सरकारने (Zilha Parishad Bharti 2022) परीक्षेसाठी चार खासगी कंपन्यांची निवड केली. यातील न्यासा कंपनीसोबत ग्रामविकास विभागाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली होती. मात्र, न्यासा कंपनीसोबतचा करारही सरकाने रद्द केल्याने जिल्हा परिषदेच्या भरतीमध्ये पुन्हा खोडा निर्माण झाला होता. शासनाने आता नव्याने तीन कंपन्या निवडल्या असून त्यामार्फत परीक्षा घेण्यात येणार आहे.

3 मार्च 209 ला शासनाने महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांमध्ये विविध पदांच्या भरतीची जाहिरात काढली होती. त्यात सर्वाधिक 729 पदे अहमदनगर जिल्ह्यात, तर सर्वात कमी 142 पदे भंडारा जिल्हा परिषदेतील आहेत. या एकूण 13521 पदांसाठी राज्यभरातून 12 लाख 72 हजार 391 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. खुल्या प्रवर्गाच्या एका पदासाठी 500 रुपये, तर आरक्षित वर्गासाठी 250 रुपये एवढे परीक्षा शुल्क आकारले गेले.

अशी आहेत राज्यातील जिल्हानिहाय पदे – (Zilha Parishad Bharti 2022)

अहमदनगर – ७२९
अमरावती – ४६३
अकोला – २४२
औरंगाबाद – ३६२
भंडारा – १४२
बीड – ४५६
चंद्रपूर – ३२३
गोंदिया – २५७
गडचिरोली – ३३५
हिंगोली – १५०
नाशिक – ६८७
लातूर – २८६
नंदुरबार – ३३३
पालघर – ७०८
परभणी – २५९
रायगड – ५१०
सातारा – ७०८
नागपूर – ४१८
पुणे – ५९५
बुलडाणा – ३३२
वाशिम – १८२
यवतमाळ – ५०५
जालना – ३२८
उस्मानाबाद – ३२०
ठाणे – १९६
नांदेड – ५५७
रलागिरी – ४६६
सिंधुदुर्ग – १६२
धुळे – २१९
वर्धा – २६७
जळगाव – ६०७
कोल्हापूर – ५३२
सांगली – ४७१
सोलापूर – ४१४

रिक्त पदांचे नाव –

कनिष्ठ अभियंता, ग्रामसेवक, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, विस्तार अधिकारी, कृषी व सांख्यिकी, स्थापत्य सहायक, पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ सहायक (लेखा), वरिष्ठ सहायक (लिपिक), अंगणवाडी पर्यवेक्षक, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ यांत्रिकी

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com