Yoga Practice : पुणे विद्यापीठ देणार योगशास्त्राचे धडे; असा करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक (Yoga Practice) शिक्षण मंडळाच्या वतीने योग विषयक प्रमाणपत्र अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2017-18 पासून सुरू करण्यात आलेला आहे. इयत्ता बारावी उत्तीर्ण किंवा समकक्ष असे कोणीही या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात. या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा कालावधी तीन महिन्यांचा आहे. दिनांक 2 जानेवारी 2023 पासून याचे प्रवेश अर्ज सुरू होत असून दिनांक 14 जानेवारी 2023 पर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहे, अशी माहिती क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. दीपक माने यांनी दिली आहे.

असा आहे योग अभ्यासक्रम (Yoga Practice)

या अभ्यासक्रमासाठी 50 जागा असून प्रथम प्रवेश घेणाऱ्या व्यक्तीस प्रथम प्रधान्यानुसार प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी भारतीय तसेच परदेशी विद्यार्थी देखील ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या अभ्यासक्रमाची वेळ दररोज दुपारी 3 ते 6 आहे. विद्यार्थ्यांना (Yoga Practice) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या http://www.unipune.ac.in/ या वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येणार आहे. या अभ्यासक्रमात पारंपारिक योग व निरोगीपणा योग पद्धती शरीर विज्ञान आणि योग विज्ञान अध्यापन पद्धती या विषयांचे अध्यापन दिले जाणार आहे व विविध योग आसने शिकवली जाणार आहेत.

परीक्षेचे स्वरूप

या अभ्यासक्रमासाठी 200 गुणांची लेखी व 100 गुणांची प्रात्यक्षिक अशी एकूण 300 गुणांची 12 क्रेडिटची अंतिम श्रेयांक परीक्षा घेतली जाते. हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना (Yoga Practice) योगाच्या अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. तसेच योगामध्ये पुढील शिक्षणासाठी सदर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठात एम.ए. योगा या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमात सुद्धा प्रवेश घेता येईल.

अभ्यासक्रमाला वाढत प्रतिसाद

उत्तम आरोग्याविषयी तरुणांमध्ये जागरूकता निर्माण होने ही सकारात्मक बाब आहे. याचाच परिणाम म्हणून विद्यापीठाच्या योग विषयक प्रमाणपत्र अभ्यासक्रमाला (Yoga Practice) विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढत आहे. या अभ्यासक्रमाच्या शिक्षणामुळे आरोग्याविषयी जनजागृती निर्माण होण्यास मदत होत असल्याचेही डॉ. दिपक माने यांनी सांगितले.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com