Women Empowerment : ‘या’ रेल्वे स्टेशनचं जगाला वाटतं कौतुक!! कारण… इथे सर्व कामे महिलाच करतात मॅनेज; पहा कसं?

करिअरनामा ऑनलाईन । आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या (Women Empowerment) बरोबरीने खांद्याला खांदा लावून कामात आघाडी घेताना दिसतात. महिलांनी त्यांच्यातील अंगभूत कौशल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात आपली मोहोर उमटवली आहे. आपल्या देशात असे एक रेल्वे स्थानक आहे जिथे संपूर्ण देखभाल महिला कर्मचाऱ्यांकडून केली जाते. केवळ तिकीट विक्रेतेच नाही तर तिकीट कलेक्टर, स्टेशन मास्तर, स्वच्छता कर्मचारी यांसह सर्व कामे महिलाच सांभाळतात.

Women Empowerment (1)

भारतीय रेल्वे स्थानकाने गांधी नगर, राजस्थान येथील रेल्वे स्थानक देशातील ‘पहिले महिला रेल्वे स्थानक’ म्हणून  घोषित केले आहे. भारतीय रेल्वेने सर्व महिला रेल्वे कर्मचाऱ्यांना उत्तर पश्चिम रेल्वे अंतर्गत जयपूर जिल्ह्यातील गांधी नगर रेल्वे स्थानकावर नियुक्त केले आहे. हे रेल्वे (Women Empowerment) स्थानक असे पहिले स्थानक आहे जिथे संपूर्ण ऑपरेशन आणि देखभाल महिला कर्मचाऱ्यांकडून केली जाते. केवळ तिकीट विक्रेतेच नाही तर तिकीट कलेक्टर, स्टेशन मास्तर, स्वच्छता कर्मचारी यांसह सर्व कामे इथे फक्त आणि फक्त महिला कर्मचारीच सांभाळतात.

Women Empowerment (1)

राजस्थानमधील गांधी नगर रेल्वे स्थानकात 40 महिला कर्मचारी आहेत आणि या महिला पुरुषांपेक्षा अधिक प्रभावीपणे काम करत आहेत. या रेल्वे स्थानकावरून (Women Empowerment) एका दिवसात 50 गाड्या जातात, ज्यामध्ये 24 गाड्या या  स्थानकावर थांबतात. इथे दररोज सुमारे 7000 प्रवासी येतात.

जलद सेवा, कमी रांगा, सीसीटीव्ही कॅमेरे आणि उत्तम स्वच्छता या बाबतीत प्रवाशांच्या अनुभवात बरेच बदल झाले आहेत. महिला प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे स्थानकावर (Women Empowerment) महिला पोलीस ठाणे सुरु करण्यात आले आहे. तसेच महिलांच्या सोयीसाठी इथे सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन बसविण्यात आले आहे.

 

Women Empowerment (1)

महिला कर्मचाऱ्यांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने, भारतीय रेल्वेने रेल्वे स्थानकाच्या संपूर्ण देखभालीमध्ये महिला कर्मचाऱ्यांना सहभागी करून (Women Empowerment) घेण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचा समाजावर सकारात्मक  प्रभाव पडेल अशी आशा भारतीय रेल्वेला आहे.

 

Women Empowerment (1)

भारतासारख्या देशात महिलांचा श्रमशक्तीमध्ये सहभाग फक्त 27% आहे तिथे केवळ महिला स्वत: रेल्वे स्थानकाचे  संपूर्ण व्यवस्थापन करण्यास सक्षम आहेत ही बाब महिला वर्गाला प्रेरणा देणारी आहे.

मुंबई झोनचे माटुंगा रेल्वे स्थानक हे देखील सर्व-महिला (Women Empowerment) कर्मचाऱ्यांद्वारे व्यवस्थापित केले जाते आणि ते स्थानक  उप-शहरी श्रेणीत आहे, तर राजस्थानच्या गांधी नगर येथील रेल्वे स्थानक मुख्य लाइन श्रेणीतील देशातील पहिले असे रेल्वे स्थानक आहे ज्याचे संपूर्ण व्यवस्थापन महिला सांभाळतात.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com