[दिनविशेष] २१ एप्रिल । म्हणून आज ‘नागरी सेवा दिन’ करतात साजरा, घेऊयात जाणून.

करिअरनामा । भारतीय नागरी सेवा दिन केंद्र व राज्य प्रशासकीय सेवेसह इतर नागरी सेवांच्या उत्कृष्टतेसाठी आजचा दिवस भारतीय नागरी सेवा दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल पुरस्कृत केलं जातं.

२१ एप्रिलच  ‘नागरी सेवा दिन’ म्हणून का निवडण्यात आला..? जाणून घेऊयात.

स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी 1947 मध्ये दिल्लीच्या मेटकाल्फ हाऊस येथे प्रशासकीय सेवा परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना संबोधित केले होते.  त्या दिवसाच्या स्मरणार्थ ही तारीख निवडली जाते, तेव्हा त्यांनी नागरी सेवकांना ‘स्टील फ्रेम ऑफ दि इंडिया’ म्हणून संबोधले होते. 

अशाच प्रकारचा कार्यक्रम प्रथम 21 एप्रिल 2006 रोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे आयोजित करण्यात आला होता. या दिवसाचे महत्व म्हणून भारत सरकार दरवर्षी २१ एप्रिलला ‘नागरी सेवा दिन’ म्हणून साजरे करते. 

स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल 21 एप्रिल 1947 मध्ये दिल्लीच्या मेटकाल्फ हाऊस येथे प्रशासकीय सेवा परिविक्षाधीन अधिकाऱ्यांसमवेत


नागरी सेवा दिनाचा एक भाग म्हणून दरवर्षी पंतप्रधानांच्या हस्ते  ‘प्राधान्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणी आणि नाविन्यपूर्ण श्रेण्यांसाठी’ तसेच ‘सार्वजनिक प्रशासनात उत्कृष्टतेसाठी पारितोषिके’ ( जिल्हातील वा एखादी योजनेच्या उत्कृष्ट अंमलबजावणी साठी) देण्यात येतात.

———————————————————-
स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयासाठी आमच्या करीअरनामाच्या परिक्षाभिमुख असलेल्या ‘दिनविशेष व Gk update’ सेक्शन ला भेट देत रहा.
———————————————————-
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 78218 00959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट www.careernama.com व Facebook page  करीअरनामाला भेट द्या.  

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
✉ [email protected]
———————————————————-