१२ वी नंतर पुढे काय ? असा प्रश्न असेल तर नक्की वाचा…

करिअरनामा । जर आपण १२ वीचे विद्यार्थी आणि बोर्ड परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्याला अनेकजण विचारत असतील की आता १२ वी नंतर पुढे काय ? तसेच अनेक पालकांना ही प्रश्न असेलच की आता १२ वी नंतर काय करावे लागेल? कोणत्या फिल्डमध्ये जास्त स्कोप आहे? इत्यादी. काही विद्यार्थी हे 12 वीतचं ठरवतात की त्यांना पुढे जाऊन काय करायचे आहे? कोणती फिल्ड निवडायची आहे? पण काही विद्यार्थ्यांना १२ वी नंतर काय करावे हे परीक्षेचा निकाल लागला तरी कळत नाही. त्यामुळे १२ वी नंतर पुढे काय करावे ? कोणते करिअर निवडावे याची शंका असेल तर पुढील टिप्स नक्की वाचा.

कशी करावी पदवीच्या कोर्सेसची निवड –

ग्रेजुएशन स्तरासाठी योग्य कोर्स निवडणे गरजेचे आहे. १२ वीं नंतर योग्य कोर्सेस निवडत असताना आपल्याला काय जमते. आपली पात्रता काय आहे. हे ओळखणे गरजेचे आहे. आपण निवडलेला विषय आपल्याला चांगला जमतो का ? याचा विचार करणे गरजेचे आहे. थोडक्यात काय तर आपण कोणतीही फिल्ड निवडण्याच्या अगोदर आपले आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.जेणेकरून आपला निर्णय चुकू नये.

फिल्ड निवडताना आपल्या आवडीचा विचार करा –

कोणत्याही कोर्सची निवड करताना आपल्या आवडीचा विचार करा. आपल्याला कशात इंटरेस्ट आहे. याकडे जरा काळजीपूवर्क लक्ष द्या. जेणेकरून आपला निर्णय चुकणार नाही. आपण जी विषय निवडतोय तो आधी व्यवस्थित समजून घ्या. तुमच्या पालकांनी जरी तुमच्यासाठी एखादी फिल्ड निवडली असेल तर त्यांच्या दबावाखाली येऊन चुकीची फिल्ड निवडू नका. तुमची आवड त्यांना सांगा.

भविष्यासाठी काय फायद्याचे आहे –

महाविद्यालयीन कोर्सेस निवडण्याच्या वेळेचे निरीक्षण करण्याचा एक महत्त्वाचा विषय आहे. ज्याच्या संभाव्य शक्यता आहेत. जर एखादा वेगळा विषय निवडला तर तो आपल्या भविष्यासाठी कसा फायदेशीर असेल. याची आधी नीट विचारपूस करा. त्यातून तुमचा कसा फायदा होईल. याचा नीट विचार करा आणि मगच तुमचा विषय निवडा. या ट्रिक्स वापरून जर तुम्ही फिल्ड निवडली तर तुम्हाला कदाचित तुमचा निर्णय चुकणार नाही.

अधिक माहितीसाठी –   www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]