What is IBPS : ‘ही’ परीक्षा द्या आणि देशातील ‘या’ मोठ्या बँकांमध्ये जॉब मिळवा; जाणून घ्या कसं?

करिअरनामा ऑनलाईन। बँकिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी (What is IBPS) अनेक तरुण-तरुणी धडपड करत असतात. काही होतकरू विद्यार्थी बारावीनंतर शिक्षण घेण्यासोबतच बँकेत जॉब मिळवण्यासाठी परीक्षांची तयारी करत असतात. या सर्व बँकांच्या परीक्षा IBPS म्हणजे इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पर्सनल या संस्थेद्वारे घेण्यात येतात. मात्र हे IBPS आहे तरी काय? ही परीक्षा दिल्यानंतर नक्की कोणत्या बँकांमध्ये जॉब मिळू शकतो? असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील तर चला जाणून घेऊया IBPS च्या परीक्षेविषयी…

देशातील काही प्रमुख बँकांसाठी नोकर भरतीची घोषणा IBPS ने केली आहे. त्यानुसार आता तब्बल सहा हजार पदांसाठी भरती होणार आहे. या परीक्षेची अधिसूचना जारी (What is IBPS) करण्यात आली आहे. उमेदवारांना www.ibps.in वर अर्ज करावा लागेल. त्याअंतर्गत लिपिकाची 6035 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

दरवर्षी लाखो उमेदवार IBPS ची परीक्षा  देतात. तुम्हीही IBPS Clerk Recruitment अधिसूचना 2022 तपासून अर्ज करू शकता. तसेच, तुम्हाला IBPS परीक्षा आणि त्याच्याशी (What is IBPS) संबंधित प्रत्येक तपशील माहित असणं आवश्यक आहे.

IBPS म्हणजे काय? (What is IBPS)

  • IBPS म्हणजे Institute of Banking Personnel Selection.
  • IBPS ही अशी एक संस्था आहे, जी बँकेतील नोकरीसाठी परीक्षा घेते.
  • या संस्थेद्वारे भारतातील 11 सरकारी बँकांमध्ये नोकरीसाठी अर्ज करता येतो. (What is IBPS)
  • मात्र यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाची परीक्षा सामील होत नाही.
  • स्टेट बँक ऑफ इंडिया भरतीची परीक्षा वेगळी घेण्यात येते.

IBPS Clerk साठी पात्रता काय?

  1. लिपिक पदांसाठी अर्ज करणार्‍या (What is IBPS) उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेली असावी.
  2. महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही शाखेतले पदवीधर उमेदवार या रिक्त पदावर अर्ज करण्यास पात्र आहेत.
  3. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 20 वर्षांपेक्षा जास्त आणि 28 वर्षांपेक्षा कमी असावं.
  4. तसंच आरक्षणाच्या कक्षेत येणाऱ्या उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाते.

या बँकांमध्ये मिळते नोकरी – (What is IBPS)

1. बँक ऑफ इंडिया
2. कॅनरा बँक
3. इंडियन ओव्हरसीज बँक
4. युको बँक
5. सेंट्रल बँक ऑफ इंडिया
6. बँक ऑफ बडोदा (What is IBPS)
7. पंजाब नॅशनल बँक
8. युनियन बँक ऑफ इंडिया
9. इंडियन बँक
10. पंजाब अँड सिंध बँक
11. बँक ऑफ महाराष्ट्र

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com