बी.एस्सी पदवीधारक उमेदवारांना नौदलात नोकरीची सुवर्ण संधी; ‘या’ पदासाठी भरती सुरू

Get real time updates directly on you device, subscribe now.

करीअरनामा ऑनलाईन – बी. एस्सी पदवीधारक उमेदवारांना नौदल गोदीत नोकरीची संधी आहे. वैज्ञानिक सहाय्यक पदासाठी पश्चिम नौदल कमांड मुख्यालयाने जागा काढल्या आहेत. जाहिरातीनुसार, उमेदवारांना १६ जानेवारीपर्यंत यासाठी अर्ज करायचा आहे.

१) पदाचे नाव- वैज्ञानिक सहाय्यक

२) पात्रता
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स किंवा समुद्री विज्ञान (ओशनोलॉजी) यापैकी कुठल्याही विषयात विज्ञान पदवी (बीएस्सी) घेतलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.

३) अनुभव
उमेदवारांना धातू विश्लेषण, धातू तंत्रज्ञान किंवा यांत्रिक कंपने (व्हायब्रेशन), त्याच्याशी संबंधित विश्लेषण तसेच तंत्रज्ञान किंवा वंगण रसायनशास्त्र अशा प्रकारच्या कामाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणे अत्यावश्यक आहे.

४) वयोमर्यादा- कमाल ३० वर्षे

५) भरती प्रक्रिया

उमेदवाराची आधी १०० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाईल. सामान्य इंग्रजी, अंकात्मक क्षमता व सामान्य बुद्धिमता यासाठी प्रत्येकी दहा गुण, विज्ञान व तंत्रज्ञानासाठी २० गुण तसेच संबंधित क्षेत्रावर आधारित ५० गुणांची ही परीक्षा असेल. अर्जासंबंधीची माहिती केंद्र सरकारच्या http://employmentnews.gov.in या संकेतस्थळावर मिळू शकेल.

हे पण वाचा -
1 of 12

जागांचा प्रवर्गनिहाय तपशील –

एकूण १४ जागा

प्रवर्ग जागा

खुला

इतर मागासवर्ग

एससी

एसटी

आर्थिकदृष्ट्या मागास

 

Get real time updates directly on you device, subscribe now.