मुंबईतील शाळांमध्ये आता वाजणार ‘वॉटर बेल’…

Get real time updates directly on you device, subscribe now.

रोजगार विश्व । आजकालच्या स्पर्धेच्या युगात जीवनशैली देखील वेगाने बदलत आहे. अशा बदलत्या जीवनशैलीमुळे मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. परिणामी मुलं अगदी छोट्या छोट्या संसर्गजन्य आजारांना बळी पडत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने एक महत्त्वाचा प्रस्ताव पालिका सभागृहापुढे मांडला आहे.

शाळेत जाणाऱ्या मुलांना योग्य प्रमाणात पाणी पिणे आवश्यक असते. मुले पाणी पिण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण करुन देण्यासाठी मुंबईतील शाळांमध्ये मधल्या सुट्टीसोबतच वॉटर बेल असावी, अशी सूचना शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांनी पालिका सभागृहापुढे मांडली आहे. त्यामुळे मधल्या सुटीव्यतिरीक्त शाळेच्या अभ्यासाच्या वेळेत पाणी पिण्याची सुट्टी मुलांना मिळणार आहे. विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण करुन देण्यासाठी दर तासाने एक बेल वाजवली जाणार आहे.

मुंबईतील खासगी व पालिकेच्या शाळांमध्येही एका सत्रात तीनवेळा घंटा वाजवून पाणी पिण्याची मुलांना आठवण करुन द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी केली आहे. याबाबतची ठरावाची सूचना त्यांनी पालिका सभागृहाच्या मंजुरीसाठी मांडली आहे. सभागृहाच्या मंजूरीनंतर, पालिका आयुक्तांच्या आदेशानं याची अंमलबजावणी करणे शक्य होणार आहे.

हे पण वाचा -
1 of 3

सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट https://careernama.com/ व Facebook page करीअरनामाला भेट द्या.

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

✉ official.careernama@gmail.com

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: