5 वी ते 8 वी पर्यतच्या शाळा सुरू करण्याबाबत शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती
करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील काही जिल्ह्यातील नववी ते बारावीचे वर्ग सुरळीत सुरू झालेले आहेत. दिवसेंदिवस विद्यार्थी संख्या वाढत आहे. सुदैवाने कोरोनाचा कोणत्याही प्रकारच्या प्रार्दुभावाने विद्यार्थी व शिक्षक संक्रमित झाले नाहीत ही अत्यंत समाधानकारक बाब आहे. स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसारच राज्यातील इतर जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करेल.