करिअरनामा आॅनलाईन | शिक्षण विभागात सरळसेवा भरती होणार आहे. याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. शिक्षण खात्यात कनिष्ठ लिपिक पदासाठी 266 पदांची भरती निघाली आहे. त्यामुळे शिक्षण खात्यात नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व विभागीय मंडळातील कनिष्ठलिपिक संवर्गातील एकूण२६६पदांपैकी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांना वगळून इतर प्रवर्गातील ५०% पदांसाठी नियुक्ती देण्यास मान्यता देण्याचानिर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व विभागीय मंडळातील कनिष्ठलिपिक संवर्गातील एकूण२६६पदांपैकी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांना वगळून इतर प्रवर्गातील ५०% पदांसाठी नियुक्ती देण्यास मान्यता देण्याचानिर्णय घेण्यात आला आहे. pic.twitter.com/LgeoIbO7k4
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) January 29, 2021
दरम्यान, याबाबत अद्याप अर्ज प्रक्रिया सुरु झालेली नाही. लवकरच अर्ज प्रक्रिया सुरु होऊन भरतीबाबची माहिती आपल्या www.careernama.com या संकेतस्थळावर वाचायला मिळेल.
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.
करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.
अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com