कोट्यावधीची उलाढाल असलेल्या वेडिंग प्लॅनिंग या व्यवसायात वेगवेगळ्या व्यवसाय संधी; जाणून घ्या याबाबत

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन | कोरोना काळामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये आलेल्या मंदीमुळे नोकरी मिळणे कठीण होऊन बसले आहे. यामुळे आता तरुण पिढी ही व्यवसायाकडे वळू लागली आहे. अनेक तरुण हे व्यवसायामधून स्थिर होऊन चांगल्या प्रकारे कमाईही करत आहेत. असाच एक व्यवसाय ज्यामध्ये अनेक प्रकारच्या व्यावसायिक संधी आहेत त्याची माहिती आम्ही आपल्यासाठी घेउन आलो आहोत

विवाह अशी गोष्ट आहे जी वेगवेगळ्या जाती-धर्मांमध्ये अत्यंत महत्त्वाची आणि गरजेची गोष्ट बनलेली आहे. यामुळे लग्नामध्ये मोठ्यात मोठा खर्च करण्याची परंपरा समाजामध्ये होत असल्याचे दिसून येते. प्रत्येक जनाला आपले लग्न हे अविस्मरणीय होईल असेच करायचे असते. त्यामुळे कुंडली ग्रह आणि पत्रिका जुळली की लगेच लग्नाची मुहूर्त ठरवला जातो. लग्नाचे बजेट जास्त असेल तर हे सर्व नियोजन वेडिंग प्लॅनरकडे दिले जाते. त्यामुळे लहानात लहान व मोठ्यात मोठी गोष्ट ही वेडिंग प्लॅनर च्या अखत्यारीत येते. वेडिंग प्लॅनर हे स्वतः या वेगवेगळ्या गोष्टी करत नाहीत तर तेही या बाहेरून विकत घेतात. यामुळे अनेकांना रोजगार प्राप्त होतो.

या व्यवसायाच्यामध्ये अनेक छोट्या-छोट्या गोष्टींची गरज लागते. आणि वेगवेगळ्या लोकांची ही गरज लागते त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते. या प्रोसेस मध्ये मॅच मेकर्स यांची भूमिका महत्त्वाची असते. त्यासाठी स्थळांचा तपास करणे आणि वधू-वराची जोडी जुळवणे हे मॅच मेकर चे काम आहे. अनेक लोक लाखो रुपये खर्च करतात आणि ही महत्त्वाची जबाबदारी सोपवतात. वेडिंग आर्किटेक्ट किंवा वेडिंग प्लॅनर हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे काम असते. चांगल्या लग्नाच्या नियोजकाला जवळपास 10 ते 15 टक्के रक्कम ही एकूण रकमेमधून मिळत असते. त्यामुळे त्यांना ही मोठी जबाबदारी आणि महत्त्वाच्या कामांमध्ये यांचे योगदान असते.

वेडिंग ऑर्गनायझर लग्नामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे लग्न विविध पूर्ण आणि आकर्षक करायचे असेल तर वेडिंग ऑर्गनायझर ची खूप मदत होते. देशांतर्गत मोठ्या ठिकाणी अथवा आंतरराष्ट्रीय ठिकाणात कोठेही लग्न करायचे असेल तर त्यामध्ये चांगला वेडिंग ऑर्गनायझर संपूर्ण भूमिका घेत असतात. यामुळे वेडिंग ऑर्गनायझर यांना खूप महत्त्व आहे. यासोबतच डेस्टिनेशन मॅनेजर, फोटोग्राफर, फॅशन डिझायनर, ज्वेलरी डिझायनर, मेहंदी कलाकार, वेडिंग कार्ड डिझायनर आणि फुलवाला इत्यादी व्यक्तींच्या अत्यंत महत्त्वाच्या भूमिका ह्या मोठ्या लग्नामध्ये असतात. एका लग्नासाठी या व्यक्ती मोठ्या प्रमाणात शुल्क आकारतात व यातून मोठी आकर्षक रक्कम ते मिळवत असतात. यामुळे या क्षेत्राकडे मोठा व्यवसाय म्हणूननही आज-काल पाहण्यात येत आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.