Van Vibhag Recruitment 2023 : महाराष्ट्र वन विभागात 2138 पदांवर मेगाभरती; पात्रता फक्त 10 वी/12 वी पास

करिअरनामा ऑनलाईन । वन विभागातील वनरक्षक (गट क) पदाच्या (Van Vibhag Recruitment 2023) भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 2138 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 10 जून 2023 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे.

संस्था – वन विभाग, महाराष्ट्र शासन
भरले जाणारे पद – वनरक्षक
पद संख्या – 2138 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु – 10 जून 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – महाराष्ट्र
अर्ज फी – (Van Vibhag Recruitment 2023)
सर्वसाधारण प्रवर्ग – रु. 1000/-
मागास प्रवर्ग – रु. 900/-
निवड प्रक्रिया – ऑनलाईन परीक्षा
Van Vibhag Forest Guard Bharti 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (12 वी) ही विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
2. अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10 वी ) उत्तीर्ण केली असल्यास असा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील. (Van Vibhag Recruitment 2023)
3. माजी सैनिक असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10 वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
4. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वन खबरे व वन कर्मचा- यांचे पाल्य असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10० वी) उत्तीर्ण केली असल्यास असा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
(टिप- नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा-याचे संबंधात वरील प्रयोजनाकरिता शासकीय वैद्यकीय अधिकारी (Van Vibhag Recruitment 2023) आणि पोलिस खात्यातील घटनेच्या कार्यक्षेत्रातील सक्षम पोलिस अधिकारी यांचे कडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र विचारार्थ घेण्यात येईल.)
6. मराठी भाषेचे ज्ञान (लिहीणे, वाचणे व बोलणे) आवश्यक आहे.

मिळणारे वेतन – Rs. 29,200 ते 92,300/- दरमहा
वय मर्यादा – 18 ते 25 वर्षे

असा करा अर्ज – (Van Vibhag Recruitment 2023)
1. वनरक्षक पदाकरिता अर्ज करताना उमेदवार हे फक्त कोणत्याही एका वनवृत्तासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करु शकेल.
2. अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
3. जिल्हा रोजगार कार्यालय, जिल्हा समाज कल्याण कार्यालय, सैनिक कल्याण कार्यालय इत्यादी कार्यालयांकडे नोंदणीकृत असलेल्या उमेदवारांनी देखील स्वतः ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
4. उमेदवाराने www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर जाऊन भरती प्रक्रिया (Recruitment) या टॅबवर क्लिक करावे. या टॅब मध्ये अर्ज करण्याकरिता लिंक उपलब्ध राहील. तसेच या टॅबवर जाहिरात उपलब्ध आहे. सदर जाहीरातीचे अवलोकन करुनच उमेदवाराने अर्ज करावयाचा आहे.
5. तसेच, उमेदवार खाली दिलेल्या लिंक वरून देखील अर्ज करू शकतात.

निवड प्रक्रिया –
1. उमेद्वारंची निवड ऑनलाईन परीक्षेद्वारे केली जाईल.
2. ऑनलाईन अर्जातील (Van Vibhag Recruitment 2023) माहितीनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची, २०० गुणांची (एकूण १०० प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला २ गुण) स्पर्धात्मक ऑनलाईन परीक्षा टि.सी. एस. आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सव्हिर्सेस लिमिटेड) यांचेमार्फत घेण्यात येईल.
3. ऑनलाईन परीक्षेमध्ये खालीलप्रमाणे ४ विषयांना गुण देण्यात येतील.
Van Vibhag Accountant Bharti 2023
काही महत्वाच्या लिंक्स – (Van Vibhag Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY (लिंक १० जून २०२३ पासून सुरु होईल)

अधिकृत वेबसाईट – mahaforest.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com