ठाण्यात MBBS पदवी धारकांची तातडीची भरती, १.७५ लाख पगार; इथे करा अर्ज

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील कोरोना स्थिती बिकट होते आहे. रुग्ण वाढत आहेत आणि उपचारासाठी लोक कमी पडत आहेत. शासनाने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी तात्काळ स्वरूपात काही दवाखाने देखील बनविले आहेत. आता डॉक्टर आणि इतर कर्मचारी वर्गाची आवश्यकता आहे. अमित देशमुख यांनी काही दिवसापूर्वी राज्यातील एमबीबीएस झालेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते. डॉक्टर, नर्स आणि इतर कमर्चाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार असल्याचे सांगितले होते. आता ठाणे जिल्ह्यात डॉक्टर आणि इंटेन्सिव्हिस्ट यांची गरज असल्याचे ट्विट महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

या डॉक्टर, इंटेन्सिव्हिस्ट (आयसीयू मधील रुग्णांना विशेष सेवा पुरवितो) यांना  मानधन तत्त्वावर घेतले जाणार असून इंटेन्सिव्हिस्ट ना १.७५ लाख तर डॉक्टर ना ९० हजार मानधन दिले जाईल अशी माहिती आव्हाड यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून दिली आहे. इच्छूकांनी covidcarekalwamumbra@gmail.com या ईमेलवर आपल्या रिझ्युम सोबत अर्ज करावा अशी माहिती त्यांनी दिली आहे. साधारण ५ ते ६ डॉक्टर व २ ते  ३ इंटेन्सिव्हिस्ट लागणार असल्याचे आव्हाड यांनी सांगितले आहे.

हे पण वाचा -
1 of 66

 

कोरोना संकटकाळात प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. राज्यातील रुग्णसंख्या ७४ हजार पार झाली आहे. तसेच बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही चांगली आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.