UPSC Success Story : सलग चार वेळा अपयश… पाचव्यांदा बनली IPS; वाचा मोहिता शर्मा यांच्या जिद्दीची कहाणी

करिअरनामा ऑनलाईन । प्रवास इतका सोपा नव्हता; पण उराशी स्वप्न बाळगलं होतं (UPSC Success Story) ते पूर्ण करण्यासाठी ध्येयवेडी वाटचाल सुरु होती. ही कहाणी आहे; हिमाचल प्रदेशातील कांगडा येथील मोहिता शर्मा यांची त्या 2017 बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांच्यासाठी UPSC परीक्षा पास होणं इतकं सोपं नव्हतं; त्याला कारण होतं त्यांच्या कुटुंबाची प्रतिकूल आर्थिक परिस्थिती. आर्थिक अडचणींशी सामना करत मोहित यांनी देशातल्या सर्वात अवघड समजल्या जाणाऱ्या UPSC परीक्षेत पास होत IPS पदापर्यंत मजल मारली आहे. वाचूया एका जिद्दीची कहाणी…

वडील मारुती कंपनीत काम करायचे

मोहिता शर्मा हिमाचलमधील कांगडा येथील रहिवासी आहेत. परंतु काही कारणास्तव त्यांचे कुटुंब दिल्लीला गेले. मोहित यांचे वडील मारुती कंपनीत काम करायचे तर आई गृहिणी म्हणून (UPSC Success Story) सर्व जबाबदाऱ्या पार पडत. मोहिता यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती तशी चांगली नव्हती, पण तिच्या वडिलांनी मोहिताच्या अभ्यासात कोणतीही कमतरता पडू दिली नाही. मोहिताने कठोर परिश्रम केले आणि UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन त्या IPS अधिकारी झाल्या.

दिल्लीत गिरवले शिक्षणाचे धडे (UPSC Success Story)

मोहिता शर्मा यांनी दिल्ली पब्लिक स्कूल (DPS) द्वारका येथून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर भारतीय विद्यापीठ कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये इंजिनीअरिंग केले. B.tech केल्यानंतर मोहिता यांनी नागरी सेवा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी 2012 पासून UPSC परीक्षेची तयारी सुरू केली.

असा होता प्रवास

UPSC परीक्षेच्या तयारीसाठी मोहिता यांना योग्य मार्गदर्शन करणारे कोणीच नव्हते आणि त्यामुळे त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागला. योग्य मार्गदर्शनाअभावी मोहित यांना UPSC परीक्षेत सलग (UPSC Success Story) चार वेळा अपयश आले. अपयश आले तरी खचून न जाता मोहित यांनी अभ्यास सुरूच ठेवला. प्रत्येक वेळी त्यांनी आपल्या हातून झालेल्या चुकांमधून शिकून अभ्यासात प्रगती केली. कठोर परिश्रम आणि अभ्यासातील समर्पणानंतर मोहित यांनी पाचव्या प्रयत्नात ही परीक्षा पास केली.

हे पण वाचा -
1 of 13

परीक्षांसाठी इंटरनेटची तयारी

अभ्यासासाठी दिला जाणारा वेळ वाया जाऊ नये यासाठी UPSC परीक्षेची तयारी करणारे बहुतेक लोक इंटरनेट, मोबाईल आणि सोशल मीडियापासून लांब राहतात. परंतु मोहिता शर्मा यांच्या बाबतीत परिस्थिती वेगळी होती. परीक्षेची तयारी करत असताना मार्गदर्शनाचा अभाव असल्यामुळे त्यांनी सामान्य अध्ययनाच्या तयारीसाठी (UPSC Success Story) इंटरनेटची अधिक मदत घेतली. इंटरनेटवरून भरपूर माहिती उपलब्ध करून ती व्यवस्थित तयार करण्यासाठी त्या नोट्स बनवत असत. त्यांच्या मते, योग्य नोट्स बनवल्याने अभ्यासात त्यांना या नोट्सचा खूप फायदा झाला.

KBC मध्ये 7 कोटी जिंकण्याची संधी हुकली

जगविख्यात रिऍलिटी शो कौन बनेगा करोडपती च्या 12 व्या सीझनमध्ये मोहिता शर्माने उत्कृष्ट खेळ दाखवला आणि 1 कोटी रुपयांचं बक्षीस जिंकले. मात्र स्पर्धेच्या 16 व्या प्रश्नावर उत्तर देताना गोंधळ (UPSC Success Story) झाल्यामुळे 7 कोटी रुपयांचं बक्षीस जिंकण्याची मोहिता यांची संधी हुकली. मोहिता यांना 1 कोटी रुपये जिंकून देणारा प्रश्न असा होता की, ‘यापैकी कोणत्या स्फोटकांचे प्रथम 1898 मध्ये जर्मन रसायनशास्त्रज्ञ जॉर्ज फ्रेडरिक हेनिंग यांनी पेटंट घेतले होते आणि ते दुसऱ्या महायुद्धात पहिल्यांदा वापरले होते?’ मोहिता यांनी याचे अचूक उत्तर ‘RDX’ असे दिले होते.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com