UPSC Success Story : 8 वीत झालं लग्न, पतीच्या साथीने दिली UPSC; जाणून घ्या ‘लेडी सिंघम’ एन. अंबिका कशा बनल्या IPS

करिअरनामा ऑनलाईन। काही लोकांकडून मिळणारी प्रेरणा इतरांचे आयुष्य प्रकाशमान करतात. आयपीएस (UPSC Success Story) अधिकारी एन. अंबिका यांचं व्यक्तिमत्व अशाच व्यक्तींपैकी एक आहे. त्यांचा जीवन प्रवास केवळ तरुण पिढीसाठी प्रेरणाच नाही तर, आयुष्यातील संघर्षावर मात करत कसे पुढे जावे याचे एक उत्तम उदाहरण आहे. कुठल्याही संकाटापुढे हार न मॅनटा धैर्य आणि चिकाटीने त्यावर मात करत आपण आपले ध्येय गाठले पाहिजे, या उक्तीचे जिवंत उदाहरण असणाऱ्या एन. अंबिका यांना आता मुंबईच्या ‘लेडी सिंघम’ म्हणून ओळखले जाते. मात्र, 2008 पूर्वी त्यांची ओळख काहीतरी वेगळीच होती. त्यांच्यासाठी हा प्रवास अतिशय अवघड होता.

अशी मिळाली अधिकारी होण्याची प्रेरणा

वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी अंबिका यांचा विवाह पार पडला. इतकेच नाही तर, 18व्या वर्षी त्यांच्या पदरात 2 मुले देखील होती. अंबिका त्यांचे पती पोलीस खात्यात कॉन्स्टेबल होते. त्यांच्यासोबतच अंबिका स्वातंत्र्य दिनी होणारी परेड पाहायला जायच्या. यावेळी त्यांनी आपल्या पतीला एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याला ‘सॅल्यूट’ करताना पहिले. ते कोण होते? आणि आपल्या पतीने त्यांना (UPSC Success Story) अभिवादन का केले?, असा प्रश्न अंबिका यांना पडला. यावर त्यांच्या पतीने त्यांना सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर आयपीएस अधिकारी होण्यासाठी सिव्हील सर्विसेसची परीक्षा द्यावी लागते, हे देखील त्यांनी सांगितले. याचवेळी आपण ही अशी परीक्षा द्यायची आणि अधिकारी व्हायचं, असा निश्चय अंबिका यांनी केला.

पुन्हा एकदा केली अभ्यासाला सुरुवात (UPSC Success Story)

अंबिका यांची शाळा केव्हाच सुटली होती. आता त्या संसारात रमल्या होत्या. मात्र, त्यांनी पुन्हा एकदा UPSC ची कठीण परीक्षा देऊन, त्यात उत्तीर्ण होण्याचा ठाम निश्चय केला होता. यासाठी त्यांनी एका खाजगी कोचिंग क्लासमधून 10 वीचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर डिस्टंस लर्निंगच्या माध्यमातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. हे सगळं सुरु असतानाच दुसऱ्या बाजूला आयपीएस अधिकारी बनण्याची तयारी देखील सुरु होती.

पतीने दिलेली साथ ठरली मोलाची

अंबिका आपल्या कुटुंबांसमवेत डिंडीगुल येथे राहत होत्या. त्या ठिकाणी कुठलेही कोचिंग सेंटर नव्हते. अशावेळी अंबिका यांनी चेन्नईमध्ये राहून सिव्हील सर्विसेसच्या परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयात त्यांना पतीने खंबीर साथ दिली. जेव्हा अंबिका चेन्नईमध्ये राहत होत्या, तेव्हा त्यांचे पती (UPSC Success Story) पोलीस खात्याची निकारी सांभाळून, दोन्ही मुलांचे पालनपोषण देखील करत होते. मात्र, अंबिका यांच्यासाठी देखील ही स्थिती काही सामान्य नव्हती.

UPSC Success Story of IPS N. Ambika

तीन वेळा अपयश येवूनही जिद्द सोडली नाही

अंबिका एक नव्हे तब्बल तीन वेळा या परीक्षेत अपयशी ठरल्या. मात्र, यानंतरही त्यांनी आपली जिद्द सोडली नाही. सलग तीनवेळा नापास झाल्यावर त्यांनी पुन्हा घरी यावे, अशी इच्छा त्यांच्या पतीने व्यक्त केली होती. परंतु, त्यांनी पुन्हा एकदा शेवटचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या शेवटच्या प्रयत्नात मात्र त्यांना घवघवीत यश मिळाले. 2008 मध्ये अंबिका UPSC च्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन त्या IPS अधिकारी बनल्या. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर अंबिका यांना महाराष्ट्रात पहिली पोस्टिंग मिळाली. सध्याच्या घडीला अंबिका मुंबईतील झोन-4च्या ‘डीसीपी’ आहेत. याचबरोबर त्या मुंबईच्या ‘लेडी सिंघम’ म्हणून देखील ओळखल्या जातात.

UPSC देणाऱ्यांना महत्वाचा सल्ला

एन अंबिका यांचा UPSC चा प्रवास सोपा नव्हता. त्यांनी अनेक आव्हानांचा सामना केला पण हार मानली नाही. जेव्हा त्या चेन्नईला गेलेल्या तेव्हा त्यांची परीक्षेची खऱ्या अर्थाने तयारी सुरू झाली. त्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक महत्त्वाची सूचना देतात ती म्हणजे दररोज वर्तमानपत्र वाचणे. वर्तमानपत्र वाचणे हा UPSCच्या तयारीचा एक महत्त्वाचा भाग आहे. विद्यार्थ्यांनी केवळ वर्तमानपत्र वाचू नये तर नोट्स देखील बनवाव्यात कारण आपला मेंदू केवळ मर्यादित प्रमाणात माहिती साठवू शकतो. नोट्स बनवल्याने तुम्हाला ती माहिती अधिक काळ लक्षात ठेवण्यास मदत होते.

तसेच त्या सांगतात परीक्षेच्या प्रत्येक विभागासाठी फक्त एकच सोर्स वापरावा. प्रत्येक विभागासाठी अनेक सोर्स वापरल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी आणखी एक (UPSC Success Story) उपयुक्त टीप म्हणजे त्यांनी शक्य तितक्या प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत आणि मॉक टेस्ट सिरीजमध्ये ती उत्तरे दिसली पाहिजेत. असे केल्याने तुम्हाला चांगली उत्तरे कशी लिहायची याची स्पष्ट कल्पना मिळेल जी तुम्हाला चांगली UPSC रँक मिळवण्यात मदत करेल.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com