UPSC Success Story: मुस्लिमांसाठी ‘ही’ आहे आयडॉल; ऐमान जमालने कसं मिळवलं IPS पद

करिअरनामा ऑनलाईन । जिथं पोहचण्याचं कित्येकांचं स्वप्न आहे, ते आपल्या मेहनतीच्या बळावर मिळवत ऐमान जमाल (UPSC Success Story of IPS Ayman Jamal) ही युवती तरुणाईसाठी आदर्श ठरली आहे. खास करून मुस्लीम तरुणींसाठी ती आयडॉल बनली आहे. मुस्लीम समाजातील तरुणींनी ऐमान जमालकडून प्रेरणा घ्यावी अशी तिची कामगिरी आहे. आज आपण जाणून घेणार आहोत IPS ऑफिसर ऐमान हिच्याबद्दल…

Eman Jamal IPS

IPS साठी अनेक राजस्व पदे सोडली…

गोरखपूर (उत्तर प्रदेश) मोहल्ला खुनीपूरमध्ये ऐमान राहते. तिचे वडील हसन जमाल हे व्यावसायिक आहेत, तर आई अफरोज बानो या शिक्षिका आहेत. ऐमानला हायस्कूलमध्ये 63% गुण मिळाले होते. UPSC ची खडतर परीक्षा क्रॅक करत ती आता प्रतिष्ठित अशा भारतीय पोलिस सेवेत कार्यरत आहे. यापूर्वी तिची बिहार लोकसेवा आयोगात महसूल अधिकारी म्हणून निवड झाली होती, पण तो जॉब न स्वीकारता तिने IPS होण्यासाठी UPSC परीक्षा देण्याचे ठरवले. आयपीएस होण्यापूर्वी शाहजहापूर येथे कामगार कल्याण उपआयुक्त म्हणून ती कार्यरत होती. तिनं ज्या दिवशी शाहजहापूर येथे नोकरी जॉईन केली त्याच्या दुसऱ्याच दिवशी UPSCचा निकाल जाहीर झाला आणि तिला संपूर्ण भारतातून 499 वी रँक मिळाली.

ऐमानचा शैक्षणिक प्रवास – (UPSC Success Story of IPS Ayman Jamal)

कार्मेल गर्ल्स इंटर कॉलेजमध्ये ऐमानने प्राथमिक ते बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. 2004 साली उच्च माध्यमिकमध्ये 64 टक्के, तर 2006 मध्ये 69 टक्के गुण मिळवत इंटरमीडिएट परीक्षा उत्तीर्ण झाली. सेंट अँड्र्यूज कॉलेजमधून 2010 मध्ये तिने प्राणीशास्त्र विषयाची पदवी परीक्षा उत्तीर्ण केली. तर 2016 मध्ये अण्णामलाई विद्यापीठातून मानव संसाधनचा डिप्लोमा केला. जामिया इस्लामिया विश्वविद्यालय नवी दिल्ली आणि जामिया हमदर्द या अल्पसंख्यांकासाठी चालविल्या जाणाऱ्या संस्थेत राहून ऐमानने २ वर्षे यूपीएससीची तयारी केली. ते करत असताना 2017 मध्ये तिची केंद्रीय कामगार विभागात निवड झाली. आणि 2018 मध्ये तिची शाहजहांपूर येथे सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

Ayman Jamal IPS

हे पण वाचा -
1 of 7

अभ्यासावर कसं फोकस केलं –

ऐमानने UPSC प्रीलिम्स आणि मेन्ससाठी GS (General Studies) वर सर्वाधिक फोकस केलं. या व्यतिरिक्त तिने वेळेचं योग्य व्यवस्थापन करून अभ्यासाची अचूक रणनीती ठरवली. त्यामुळं तिला अभ्यासादरम्यान येणाऱ्या आव्हानांचा सामना करता आला. धैर्य आणि योग्य मार्गदर्शनाद्वारेच यश मिळते, असं ऐमानचं म्हणणं आहे.

UPSC ची तयारी करणाऱ्या उमेदवारांना ऐमानचा सल्ला –

ऐमान जमालच्या मते, UPSC परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी शॉर्टकटला जागा नाही. तयारी करणाऱ्या उमेदवारांनी वेळापत्रक बनवून अभ्यास करणं गरजेचं आहे. ती म्हणते, वर्णनात्मक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी लेखनाचा सराव सुरु ठेवावा जेणेकरून लेखन क्षमताही वाढते आणि भाषिक चुकाही कमी होतात. सोबतच कोणत्याही विषयावर संकल्पना स्पष्ट होते. परीक्षेची तयारी करताना उमेदवारांनी त्यांच्या कमकुवतपणाचे आणि ताकदीचे निश्चितपणे मूल्यांकन केले पाहिजे. असे केल्याने आपली तयारी चांगली होते आणि यश मिळण्यापासून आपणाला कोणीही रोखू शकत नाही.

IPS ऐमान जमाल मुस्लिम मुलींसाठी आयडॉल आहे. (UPSC Success Story of IPS Ayman Jamal) अल्पसंख्यांक समाजातील मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रेरणा देण्याचं काम ती नेहमी तिच्या मार्गदर्शनातून करत असते.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com