UPSC Success Story : फुल टाइम जॉब करत केला अभ्यास; आज आहे IAS अधिकारी; यशनी सांगते वेळेचे नियोजन

करिअरनामा ऑनलाईन। UPSC ची परीक्षा ही देशातील सर्वात प्रतिष्ठित परीक्षा (UPSC Success Story) मानली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार या परीक्षेला बसतात, मात्र मोजक्याच उमेदवारांना यश मिळते. जर तुम्ही IAS इच्छुक असाल, तर तुम्ही IAS अधिकारी यशनी नागराजन यांच्या यशोगाथेकडे दुर्लक्ष करू शकत नाही. यशनी जेव्हा UPSC ची तयारी करत होती तेव्हा ती पूर्णवेळ कर्मचारी होती हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

तिने 2019 मध्ये अखिल भारतीय रँक 57 मिळवून आयएएस अधिकारी होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण केले. तिने चौथ्या प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आहे. वेळेचे उत्तम व्यवस्थापन हे तिच्या यशामागचे कारण होते. यशनी बी. टेक.च्या गुणवत्तेवर चांगल्या कंपनीत नोकरी करत होती. परीक्षेची तयारी करत असतानाही तिचे काम सुरूच होते. तिच्या मते, UPSC ची तयारी करण्यासाठी नोकरी सोडण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त चांगल्या वेळेच्या व्यवस्थापनासह कठोर परिश्रम घेण्याची गरज आहे. पाहूया IAS अधिकारी यशनीच्या कौतुकास्पद वाटचालीविषयी….

अरुणाचल प्रदेशात सुरुवातीचे शिक्षण –

यशनी नागराजनचे शालेय शिक्षण केंद्रीय विद्यालय, नाहरलगुन येथे झाले. यानंतर तिने 2014 मध्ये युपिया येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंगमधून इलेक्ट्रीकल अँड इलेक्ट्रॉनिक इंजिीअरिंगमध्ये बी. टेक. पूर्ण केले. तिचे वडील थंगवेल नागराजन हे राज्याचे सेवानिवृत्त पी. डब्ल्यू. डी. अभियंता आहेत. तर तिची आई गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्री येथील इटानगर शाखेच्या निवृत्त अधीक्षक आहेत.

पूर्णवेळ नोकरी करत केली UPSC ची तयारी –

B.Tech केल्यानंतर यशनी नागराजनला चांगली नोकरी मिळाली. पण तिचे स्वप्न नेहमीच IAS अधिकारी बनण्याचे होते. यानंतर तिने नोकरीसोबतच UPSC परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. पूर्णवेळ नोकरी करणे तितके सोपे नसले तरी उत्तम वेळेचे व्यवस्थापन करून तिने अशक्य गोष्ट शक्य केली.

दररोज 4 ते 5 तास करायची अभ्यास – (UPSC Success Story)

यशनी दररोज 4 ते 5 तास तिच्या अभ्यासासाठी देत असे. ऑफिसला सुट्टी असेल त्यादिवशी ती तो दिवस वाया घालवत नसे. वीकेंडला ती पूर्ण दिवस अभ्यास करायची. तिचा असा विश्वास आहे की तुम्ही UPSC ची तयारी करत असाल आणि पूर्णवेळ कर्मचारी आहात तर मग तुम्हाला आठवड्याच्या शेवटी नेहमीपेक्षा जास्त अभ्यास करावा लागेल. यामुळे तुमची तयारी निश्चितच मजबूत होईल. योग्य वेळेचे व्यवस्थापन तुम्हाला अभ्यासासाठी वेळ देण्यास मदत करेल.

आवडीच्या विषयांची निवड करा –

यशनी नागराजनच्या म्हणण्यानुसार, तिने इतर लोकांच्या प्रभावाखाली भूगोल हा पर्यायी विषय म्हणून निवडला. चुकीच्या विषयामुळे, ती तिच्या सुरुवातीच्या प्रयत्नांमध्ये चांगली कामगिरी करू शकली नाही. नंतर तिच्या लक्षात आले आणि तिने विषय बदलला. ती म्हणते की, तुम्ही तुमच्या आवडीचा विषय निवडावा म्हणजे तुम्हाला तो आवडीने वाचता येईल. विषय आवडला तर मनापासून वाचाल. UPSC परीक्षेत वैकल्पिक विषय महत्त्वाची भूमिका बजावतात कारण ते चांगले गुण मिळविण्यात मदत करतात.

यशनीला तिसऱ्या प्रयत्नात मिळाले यश –

यशनी नागराजनने कठोर परिश्रमाने UPSC परीक्षेची तयारी केली. पण पहिल्या दोन प्रयत्नात तिला यश मिळाले नाही. यशनी तिसर्‍या प्रयत्नात निवडली गेली . त्यात तिला संपूर्ण भारतातून 834 वा रँक मिळाला. (UPSC Success Story) पण ती तिच्या रँकवर समाधानी नव्हती. त्यानंतर तिने चौथ्यांदा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.

चौथ्या प्रयत्नात आयएएस अधिकारी –

सलग दोन अपयश आणि तिसऱ्यांदा 834 वा क्रमांक मिळवूनही यशनी नागराजनने हिंमत हारली नाही . स्वतःला प्रोत्साहन देत तिने चौथ्यांदा UPSC ची परीक्षा दिली. यशनीला चौथ्या प्रयत्नातही यश मिळाले आणि संपूर्ण भारतातून 57 वा क्रमांक मिळवून तिने चांगली रँक मिळवत IAS होण्याचे स्वप्न पूर्ण केले.

यशनी सांगते वेळेचे व्यवस्थापन –

“जेव्हा तुम्ही पूर्णवेळ नोकरीसह UPSC ची तयारी करता , तेव्हा वेळेचे व्यवस्थापन हा सर्वात मोठा घटक असतो. तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत अभ्यासासाठी वेळ काढावा लागेल. आठवड्याच्या शेवटी जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. याशिवाय वेळापत्रक असे असावे की, ज्यामध्ये तुम्ही दररोज किमान ४ ते ५ तास अभ्यास करू शकता. याशिवाय ऐच्छिक विषयही अतिशय काळजीपूर्वक निवडला पाहिजे. जर तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने तयारीला करू शकाल.”

अधिकारी होऊ पाहणाऱ्यांसाठी यशनीचा कानमंत्र –

यशनी नागराजनच्यामते, निबंध आणि नीतिशास्त्र हे असे पेपर आहेत ज्यात तुम्ही सर्वाधिक गुण मिळवू शकता. त्यामुळे या विषयांना महत्त्व देणे अत्यंत गरजेचे आहे. पूर्णवेळ नोकरी असताना UPSC ची तयारी करणे अवघड आहे , पण त्याचा तुम्हाला फायदा होईल असे ती म्हणते. तुमच्याकडे आधीच नोकरी असताना तुम्ही UPSC मध्ये नापास झालात , तरीही तुम्हाला तणाव जाणवणार नाही. तुम्ही तुमच्या करिअरची फारशी काळजी करू नका. कठोर परिश्रम आणि उत्तम वेळेचे व्यवस्थापन करून तुम्ही IAS किंवा IPS अधिकारी होऊ शकता.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com