UPSC Success Story : स्वप्न होतं ‘मिस इंडिया’ होण्याचं; क्रॅक केली UPSC; कोण आहे ही ब्युटी क्वीन

करिअरनामा ऑनलाईन । बऱ्याचवेळा असं होतं की तुमचं ध्येय (UPSC Success Story) काहीतरी वेगळं बनण्याचं असतं पण नशीब तुम्हाला वेगळ्याचं दिशेने घेवून जाते. असं काहीतरी घडलं आहे तस्किन खान या तरुणीच्या बाबतीत. माजी ‘मिस उत्तराखंड’ तस्किन खानचे ‘मिस इंडिया’ होण्याचे स्वप्न होते. पण वेळेने असं वळण घेतलं की आता ती ब्युटी क्वीन न होता IAS अधिकारी होण्यास तयार झाली आहे. तस्किन खानने UPSCची परीक्षा पास केली आहे.

UPSC Success Story of Taskeen Khan

डेहराडूनच्या तस्किन खानने UPSC 2022 ची परीक्षा 736 व्या क्रमांकासह उत्तीर्ण केली आहे. ती एक सोशल मीडिया स्टार आहे; तिचे बरेच फॉलोअर्स आहेत. 2016-17 मध्ये तिने मिस (UPSC Success Story) डेहराडून आणि मिस उत्तराखंडचा किताब पटकावला. तिचे पुढचे स्वप्न होते मिस इंडिया होण्याचे. मात्र वडिलांच्या सेवा निवृत्तीनंतर तिने नव्या दिशेने जाण्याचा विचार केला.

UPSC Success Story of Taskeen Khan

तस्किन खानने वडिलांच्या निवृत्तीनंतर UPSCची परीक्षा पास होवून सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न साकार केलं आहे. शालेय अभ्यासात ती सरासरी मार्क मिळवणारी (UPSC Success Story) विद्यार्थिनी होती. इयत्ता 8वीपर्यंत गणित विषय तिला कठीण जात असे. UPSC परीक्षेचे सलग तीन प्रयत्न असफल झाल्यानंतरही ती डगमगली नाही. तिने संयम ठेवून मेहनतीने UPSC परीक्षा पास केली आहे.

UPSC Success Story of Taskeen Khan

तस्किन खानने विज्ञान शाखेत दहावी आणि बारावीचे शिक्षण घेतले आहे. तिला हायस्कूल आणि इंटरमिजिएटमध्ये 90% पेक्षा जास्त गुण मिळाले होते. एक व्यावसायिक मॉडेल आणि अभिनेत्री असण्यासोबतच, तस्किन बास्केटबॉल चॅम्पियन, राष्ट्रीय स्तरावरील वाद-विवादक होती. शालेय शिक्षणानंतर तिने एनआयटी प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली. मात्र फी भरण्यासाठी पालकांकडे पैसे नव्हते.

 

UPSC Success Story of Taskeen Khan

तस्किन खानचा UPSC ची तयारी सुरु करण्याचा प्रवासही (UPSC Success Story) खूप रंजक आहे. तिच्या इन्स्टाग्राम फॉलोअरकडून तिला UPSCसाठी प्रयत्न करण्याची कल्पना सुचली. ती IAS पदासाठी इच्छुक होती. ती यूपीएससीच्या तयारीसाठी मुंबईतील हज हाऊसमध्ये गेली.

UPSC Success Story of Taskeen Khan

तस्किन खानला 2020 मध्ये जामिया मिलिया इस्लामियाच्या मोफत कोचिंगमध्ये प्रवेश मिळाला. त्यानंतर ती दिल्लीत आली. वडिलांच्या तुटपुंज्या पेन्शनमध्ये घरच्या कमकुवत (UPSC Success Story) आर्थिक परिस्थितीमध्ये तिने IAS होण्यासाठी कठीण परीक्षा उत्तीर्ण केली. तिची पहिली पसंती IAS होण्याची होती आणि दुसरा पर्याय भारतीय परराष्ट्र सेवा हा होता.

UPSC Success Story of Taskeen Khan

तस्किनचे वडील आफताब खान, आई शाहीन खान आणि धाकटी बहीण अलीजा खान हे मेरठमध्ये राहतात. बहीण पदव्युत्तर शिक्षण घेत आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com