UPSC Success Story : महागडे कोचिंग क्लास न लावता UPSC क्रॅक करणारा ध्येयवेडा तरुण; वाचा IAS राघवेंद्र शर्मा याची प्रेरणादायी कहाणी

करिअरनामा ऑनलाईन । UPSC प्रत्येक उमेदवारासाठी एक दिवास्वप्न. IAS होण्याचे (UPSC Success Story) प्रशिक्षण परीक्षेच्या तयारीच्या टप्प्यापासूनच सुरू होते. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक टॉपरची कहाणी प्रेरणादायी आहे. अशीच एक कथा दिल्ली येथील संत नगरच्या राघवेंद्रची आहे, जो कधी इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या अभ्यास साहित्यातून तर कधी मित्राकडून नोट्स मागवून परीक्षेची तयारी करत होता. राघवेंद्रची UPSC ची वाटचाल तशी खडतरच. पण सरतेशेवटी त्याने अथक परिश्रमाने AIR 340 रँक मिळवून आपले स्वप्न पूर्ण केले. यासाठी त्याने महागडे कोचिंग क्लास न लावता इंटरनेटवरून आणि मित्रांकडून नोट्स मिळवून अभ्यास केला.

पहिल्याच प्रयत्नात मुलाखत फेरी गाठली

राघवेंद्र शर्मा हा दिल्लीचा रहिवासी आहे. त्याचं वय अवघं 24 वर्ष आहे. त्याचे वडील बुरारी येथेच केमिस्टचे दुकान चालवतात. राघवेंद्रचे शालेय शिक्षण दिल्लीच्या सरकारी शाळेत झाले. केले आणि दिल्ली विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पदवीनंतर त्याने UPSC ची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्याने 2019 पासून परीक्षेची तयारी सुरू केली आणि पहिल्याच प्रयत्नात मुलाखत फेरी गाठली. मात्र, अंतिम गुणवत्तेत 2 गुण हुकले. यानंतर दुस-याच प्रयत्नात राघवेंद्रने UPSC क्रॅक केली आणि संपूर्ण भारतातून 340 वा क्रमांक मिळवला.

महागडे कोचिंग क्लास न परवडणारे (UPSC Success Story)

राघवेंद्रने GS च्या तयारीसाठी कोणतेही प्रशिक्षण घेतले नाही. कोचिंग क्लास लावून UPSC कोचिंग घेणं परवडणारे नाही. त्यामुळे फक्त पर्यायी विषयाचे प्रशिक्षण घेणे आणि GS च्या तयारीसाठी मित्राकडून नोट्स मागवणे हा पर्याय त्याच्या समोर होता. यासाठी त्याला इंटरनेटचा फायदा झाला. इंटरनेटवरून नोट्स डाउनलोड करून तो अभ्यास करायचा. तसेच या प्रवासात त्याला त्याच्या मित्रांनी खूप मदत केली. मित्रांनी नोट्स पुरवल्यामुळे राघवेंद्रला अभ्यास करणं सोपं जात होतं. IAS होण्यासाठी त्याने पूर्ण ताकद पणाला लावली.

पराभवाने खचू नका

परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात राघवेंद्रला यश मिळाले नाही. अंतिम निकाल लागल्यानंतर पुढील प्रिलिम्स परीक्षा अवघ्या 14 दिवसांवर येऊन ठेपली होती. पहिल्याच (UPSC Success Story) प्रयत्नात तो यशस्वी होईल; अशी त्याला खात्री होती पण संधी हुकली. पण राघवेंद्रला समजले होते की आता निराश होण्याची वेळ नाही. अपयश आले तरी तो खचला नाही. परीक्षा पास होण्याच्या ध्येयाने पछाडलेल्या राघवेंद्रने खचून न जाता परीक्षेची नव्याने तयारी केली.

कसा झाला इंटरव्ह्यू

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये मोठे अवघड प्रश्न विचारले जातात हे आपल्याला माहीतच आहे. मुलाखतीत टॉपर्सना कोणते प्रश्न विचारण्यात आले आणि त्यांनी त्यांची उत्तरे कशी दिली हे जाणून घेण्यासाठीही अनेकजण उत्सुक असतात. राघवेंद्र यांनी सांगितले की (UPSC Success Story) त्यांना मुलाखतीत परिस्थितीवर आधारित प्रश्न विचारण्यात आले जेणेकरून मनाची उपस्थिती तपासता येईल. रात्री प्रवास करताना तो एखाद्या अनोळखी, निर्जन स्थानकावर उतरला आणि ट्रेन चुकली तर काय करणार असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. याशिवाय त्यांना वर्तमान बातम्यांशी संबंधित प्रश्नही विचारण्यात आले, ज्याची त्याने सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या समतोल राखत उत्तरे दिली.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com