UPSC Success Story : भेटा उच्च पगाराची नोकरी सोडलेल्या IAS अधिकाऱ्याला, नैराश्यामुळे NDA सोडावी लागली, न हारता UPSC परीक्षा क्रॅक केली

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । मनुज जिंदाल हे महाराष्ट्र केडरचे (UPSC Success Story) 2017 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. ते माजी एनडीए (NDA) केडरचे उमेदवार देखील आहेत. मनुज जिंदाल यांनी एनडीए परीक्षेत ऑल इंडिया 18 वा क्रमांक मिळवला होता. आयएएस मनुज जिंदाल हे मूळचे गाझियाबादचे राहणारे आहेत. सुरुवातीच्या शिक्षणानंतर ते डेहराडून येथील शाळेत शिकायला गेले. शालेय शिक्षणानंतर त्यांनी वयाच्या 18 व्या वर्षी एनडीएमध्ये प्रवेश केला. इथून पुढचा प्रवास त्यांच्यासाठी कठीण होता. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात असा टप्पा येतो जिथे सर्वकाही संपलं आहे असं वाटतं. पण काहीजण असे असतात जे या संघर्षमय परिस्थितीतून वाट काढत पुढे जातात. त्यापैकीच एक आहेत मनुज जिंदाल. आज आपण त्यांच्या आयुष्यात आलेल्या चढ-उतराविषयी आणि त्यांनी यावर कशी मात केली याबाबत जाणून घेणार आहोत…

प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक काळ येतो जेव्हा सर्वकाही संपलंय असं वाटतं. पण या परिस्थितीवर मात करत ही लोकं पुढे जात राहतात. ते भविष्यात अशी झेप घेतात की पुन्हा मागे वळून पाहण्याची गरज पडत नाही. UPSC देणाऱ्या अनेक तरुणांच्या कहाण्या अशाच संघर्षाने भरलेल्या आहेत. IAS मनुज जिंदाल (IAS Manuj Jindal) यांनी UPSC (UPSC) मध्ये संपूर्ण भारतातून 53 वी रॅंक मिळवली आहे. पण इथपर्यंत पोहोचणं त्यांच्यासाठी अजिबात सोपं नव्हतं. मधल्या काळात ते नैराश्याची शिकार झाले होते. आयुष्यात खचले होते. सगळं काही संपलं आहे असंवाटत असताना ते खंबीरपणे उभे राहिले आणि पुन्हा लढले.

NDA तून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला
NDA प्रशिक्षणादरम्यान मनुज यांनी पहिल्या टर्ममध्ये चांगली कामगिरी केली होती. पण दुसऱ्या टर्ममध्ये त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले. ते नैराश्याच्या गर्तेत गेले. दिवसागणिक त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यांच्या खराब कामगिरीमुळे त्यांना NDA तून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

परदेशात शिक्षण आणि नोकरी (UPSC Success Story)
NDA तून बाहेर पडल्यानंतर मनुज यांनी परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे ठरवले. व्हर्जिनिया विद्यापीठातून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पुढे जाऊन त्यांना बार्कलेजकडून ऑफर मिळाली. जिथे 3 वर्षे त्यांनी चांगल्या पगाराच्या पॅकेजवर काम केले.

भारतात परत येवून UPSC परीक्षा दिली
परदेशात चांगल्या पगारावर नोकरी करत असताना मनुज यांनी अचानक भारतात येण्याचा निर्णय घेतला. येथे त्यांचा धाकटा भाऊ सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी करत होता. मनुज यांनीही ठरवलं आणि परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी UPSC चा फॉर्म भरला आणि 2014 मध्ये पहिल्यांदा परीक्षा दिली. यावेळी त्यांनी पूर्व आणि मुख्य परीक्षा पास केली पण त्यांना अंतिम गुणवत्ता यादीत स्थान मिळवता आले नाही.

UPSC च्या 3 ऱ्या प्रयत्नात मिळाली 53 वी रॅंक
आयुषात हरणं आणि पुन्हा प्रयत्न करणं हे मनुजसाठी लपंडावाच्या खेळासारखं झालं होतं. परीक्षेत सुरवातीला अपयश आल्यानंतर त्यांनी पुन्हा प्रयत्न केला. दुसऱ्या प्रयत्नात ते UPSC परीक्षा पास झाले पण अंतिम निकाल राखीव यादीत होता. इथेही त्यांना पुन्हा हतबल व्हावे लागले. तरी त्यांनी जिद्द सोडली नाही. UPSC च्या तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी 2017 मध्ये परीक्षा पास केली. यामध्ये त्यांना संपूर्ण भारतातून 53 वी रॅंक मिळाली आणि ते IAS अधिकारी बनले.

आयुष्यातील अनुभवांवरुन लिहलं पुस्तक
मनुज यांनी आपल्या आयुष्यात आलेल्या अनुभवावर आधारीत ‘असेसिंग द आर्ट ऑफ आन्सर रायटिंग’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. ते एक युट्यूब चॅनल देखील चालवतात; ज्यामाध्यमातून (UPSC Success Story) ते लोकांना मार्गदर्शन करतात. विद्यार्थ्यांनी यूपीएससी परीक्षा कशी द्यावी, याविषयी ते तरुणांना योग्य दिशा देण्याचं काम करतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com