UPSC Success Story : इंजिनियरिंगची लाखो पगाराची नोकरी सोडली; आज आहे IAS अधिकारी

करिअरनामा ऑनलाईन । जर एखाद्या व्यक्तीने जीवनात काहीतरी करण्याचा निश्चय केला (UPSC Success Story) असेल तर त्याच्यासाठी काहीही अशक्य नाही हे सिद्ध केलंय जागृती अवस्थीने. UPSC परीक्षेत 2020 मध्ये संपूर्ण भारतात दुसरी रँक घेत जागृती टॉपर ठरली आहे. UPSC च्या अभ्यासासाठी तिने लठ्ठ पगाराच्या नोकरीचा त्याग केला आणि घेतलेला निर्णय योग्य करून दाखवला. पण नोकरी सोडून यूपीएससी परीक्षेची तयारी करून त्यात यश मिळवण्याचा प्रवास जागृती अवस्थीसाठी सोपा नव्हता. जाणून घेऊया तिच्या प्रेरणादायी प्रवासाविषयी…

जागृती विषयी थोडेसे –

मध्य प्रदेशातील नशेनिया गावातील जागृती रहिवासी. ती पहिल्यापासूनच अभ्यासात हुशार. भोपाळच्या महर्षि विद्या मंदिर विद्यालयातून तिने माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर भोपाळच्या मौलाना आझाद नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून बीई इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी घेतली. GATE परीक्षेत पात्र ठरल्यानंतर तिची BHEL मध्ये तांत्रिक अधिकारी पदावर निवड झाली.

अभ्यासासाठी सोडली नोकरी – (UPSC Success Story)

BHEL मध्ये तांत्रिक अधिकारी पदावर जागृती काम करत होती. 2 वर्षे तिने नोकरी केली. मात्र या नोकरीवर ती समाधान नव्हती. तिला समाजासाठी काहीतरी करायचे होते; या प्रेरणेने लाखोंचे पॅकेज देणारी नोकरी तिने सोडली. अभ्यासाचा खर्च कुटुंबावर पडू नये म्हणून तिने आपल्या बचतीच्या पैशातून पुस्तके खरेदी केली.

12 ते 14 तास केला अभ्यास –

2019 मध्ये जागृतीने अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केला. दिल्लीतील एका कोचिंग क्लासमध्ये तिने प्रवेश घेतला. मात्र कोरोना संकट आणि लॉकडाऊनच्या काळात त्यांना भोपाळला परतावे लागले. पण तिचा अभ्यास थांबला नाही. जागृतीने ऑनलाइन क्लासेस केले. ती दिवसातून 8 ते 10 तास अभ्यास करायची. (UPSC Success Story) परीक्षेपूर्वी सुमारे दोन महिने तिने अभ्यासाचे वेळापत्रक बदलले आणि 12 ते 14 तास अभ्यास सुरू केला. जागृती पहिल्याच प्रयत्नात अयशस्वी ठरली. पण तिने हार मानली नाही तिने मेहनत चालूच ठेवली.

हे पण वाचा -
1 of 11

लेकीसाठी आईनेही सोडली नोकरी –

जागृतीचे वडील डॉ. सुरेशचंद्र अवस्थी भोपाळ मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत. आई मधुलता अवस्थी या क्रीडा शिक्षिका होत्या. पण जागृतीच्या अभ्यासात हेळसांड होऊ नये यासाठी तिच्या आईने नोकरीचा राजीनामा दिला. जागृतीच्या अभ्यासाच्या काळात तिचे कुटुंब टी. व्ही. आणि सोशल मीडियापासून लांब राहिले.

जागृती अवस्थी यूपीएससी परीक्षेत दुसरी टॉपर –

UPSC परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी जागृतीने केलेली मेहनत फळाला आली. आपल्या भूतकाळातील चुकांपासून धडा घेत, जागृती अवस्थीने आपल्या दुसऱ्या प्रयत्नात संपूर्ण भारतात 2 रा क्रमांक मिळवून नागरी सेवेत दाखल होण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले. 2020 मध्ये UPSC ने घेतलेल्या परीक्षेत जागृती संपूर्ण भारतातून दुसरी टॉपर तर ठरलीच पण ती महिला उमेदवारांमध्ये देशात पहिली आली आहे. जागृतीची मेहनत यशस्वी होताना पाहून आज तिच्या संपूर्ण कुटुंबाला तिचा अभिमान वाटत आहे.

यूपीएससी परीक्षेत दुसरी टॉपर ठरलेल्या जागृती अवस्थीचे आज सर्वजण कौतुक करत आहेत. जागृती अवस्थीने आपल्या मेहनत आणि समर्पणाच्या जोरावर यशाची नवी कहाणी लिहिली आहे. ती आज लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com