UPSC Success Story : ध्येयाच्या आड अपंगत्व येऊ दिलं नाही, वाचा UPSC टॉपर इरा सिंघलची कहाणी

करिअरनामा ऑनलाईन । असे म्हणतात की कठोर परिश्रमाला अपयश नाही.  मेहनतीची जोड असेल तर ध्येय (UPSC Success Story) कितीही कठीण असले तरी ते साध्य करता येते. शरीराने दिव्यांग असलेल्या UPSC च्या उमेदवाराची अशीच कहाणी समोर आली आहे. UPSC परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवार दिवस- रात्र एक करुन अभ्यास करतात. काहीजण आपापल्या घरात राहतात तर काही घरापासून हजारो किलोमीटर दूर राहून अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीत व्यस्त असतात. अशाच एका उमेदवाराची कहाणी जाणून घेऊया. एक महिला IAS जी दिव्यांग आहे. मात्र, असे असतानाही तिने आपले शारीरिक अपंगत्व स्वप्नांच्या मार्गात आड येऊ दिले नाही आणि IAS अधिकारी होण्याचे स्वप्न सत्यात उतरवले.

इरा सिंघल यांच्याविषयी थोडक्यात –

इरा सिंघल या मूळच्या उत्तर प्रदेश राज्यातील मेरठच्या राहणाऱ्या आहेत. ((UPSC Success Story) त्यांचे सुरुवातीचे शिक्षण मेरठमधील सोफिया गर्ल्स स्कूल आणि दिल्लीतील लोरेटो कॉन्व्हेंट स्कूलमधून झाले. त्यानंतर त्यांनी दिल्लीच्या नेताजी सुभाष इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून BTech केले आणि पुढे जाऊन दिल्ली युनिव्हर्सिटीमधून MBA ची पदवी घेतली. इतकेच नाही तर इराने कोका-कोला कंपनीत मार्केटिंग इंटर्न आणि नंतर कॅडबरी इंडियामध्ये स्ट्रॅटेजी मॅनेजर म्हणूनही काम केले आहे.

IAS होण्याचे स्वप्न बालवयातच पाहिलं –

इरा यांनी लहानपणी त्यांच्या जिल्ह्यात अनेकदा कर्फ्यू पाहिला होता. हा कर्फ्यू DM च्या आदेशाने लावला गेल्याचे त्यांना कळाले. DM खूप शक्तिशाली व्यक्ती आहे; असं तिला मोठी लोकं सांगायची. त्यावेळी तिच्या बालमनात अनेक प्रश्न घोळायचे. इराची जिज्ञासू वृत्ती तिला शांत बसू देत नव्हती. UPSC ची परीक्षा देऊन आपण DM होऊ शकतो हे इराच्या जिज्ञासू वृत्तीने तिला सांगितले होते. इथूनच इराने ठरवले की आपण UPSC ची तयारी करायची. खरे पाहिले तर इराला मणक्याच्या वक्रतेचा त्रास आहे. ज्याला ‘स्कोलियोसिस’ म्हणतात. अपंग असल्यामुळे त्यांच्या पात्रतेबद्दल लोकांना शंका आली असावी. पण इराने अपंगत्व कधीच तिच्या ध्येयाच्या आड येऊ दिले नाही.

Indian Revenue Services मध्ये तीन वेळा निवड –

2010, 2011 आणि 2013 या तीनही वर्षात त्यांनी UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. यावरून इरा सिंघलच्या प्रतिभेचा अंदाज लावता येतो. तिन्ही वेळा त्यांची Indian Revenue Services पदासाठी निवड झाली. असे असताना 62% क्के लोकोमोटर अपंगत्वामुळे त्यांना सामील होऊ दिले नाही. इराने त्याविरुद्ध कायदेशीर लढाईही लढवली आणि 2014 मध्ये ती केस जिंकली आणि त्यांना IRS चे पद मिळाले.

पहिली अपंग महिला टॉपर –

इरा सिंघल यांनी आपल्या यशाचा प्रवास IRS पदावर थांबू दिला नाही. 2014 च्या नागरी सेवा परीक्षेत त्यांनी अव्वल येवून दाखवले. त्या देशातील पहिली अपंग महिला टॉपर ठरल्या. या परीक्षेत त्यांनी सर्वाधिक गुण मिळवले होते. त्यांची कथा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. इरा यांना अपंग विभाग, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, महिला आणि बाल विकास मंत्रालय आणि नीती आयोगाची ब्रँड अॅम्बेसेडर देखील बनवण्यात आले आहे.

हे पण वाचा -
1 of 75

पास होऊन ही पोस्टिंग पासून लांब –

इरा सिंघल यांनी लोकसेवा आयोगाची परीक्षा 2014 मध्ये टॉप केली होती. त्या पहिल्या अशा परीक्षार्थी आहेत. ज्यांनी विकलांग असूनही जनरल कॅटेगरीमधून परीक्षेत टॉपर होण्याचा मान मिळवला होता. यापूर्वी २०१०मध्ये त्यांनी पहिल्यांदा परीक्षा पास केली होती. तेव्हा त्यांना 815 वी रँक मिळाली होती. विकलांग असल्यामुळे त्यांना पोस्टिंग मिळाले नाही. (UPSC Success Story) त्यानंतरही इरा सिंघल यांनी जिद्द सोडली नाही. त्यांनी पुन्हा परीक्षा देण्यास सुरुवात केली आणि 2014 मध्ये टॉपर राहिल्यानंतर त्यांना पोस्टिंग मिळाले.

शिक्षा देऊन विचार बदलता येणार नाहीत –

विकलांग व्यक्तींना टोचून बोलण्याचे अनेक अनुभव इरा यांना आले आहेत. त्यावर त्यांची काही स्पष्ट मते आहेत. सिंघल म्हणाल्या, ‘एखाद्याला शिक्षा देऊन त्याचे विचार बदलता येत नाहीत. तो अचानक महान व्यक्ती होणार नाही. शिक्षा देऊन आपला राग काही क्षणासाठी शांत होऊ शकतो. विकलांगांविषयी सामान्य माणसाच्या मनात असणारी मते बदलण्याची गरज आहे. कमेंट करणारा व्यक्ती मागे-पुढे न पाहता शिव्या देत आहे. ते चुकीचेच आहे. पण, ते चूक एवढ्यासाठी वाटते की त्यातील शब्द चुकीचे आहेत. आपल्याला ते शब्द बरोबर करण्याची गरज आहे. जर, आंधळे, लुळे, बहिरे होणे चुकीचे नाही तसेच, त्यावर होणाऱ्या कमेंटही चुकीच्या नाहीत. केवळ शब्द चुकीचे आहेत.’

…प्रामाणिक अधिकारी ट्रोल होतात तेव्हा…

यूपीएससी परीक्षेत टॉपर राहिलेल्या इरा सिंघल या तरुणांसाठी एक प्रेरणेचा स्रोत आहेत. संघर्षाचे अनेक टप्पे पार करताना त्यांनी अनेकांपुढे एक आदर्श ठेवला आहे. त्यांनी फेसबुक अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली. त्यात त्यांनी आपण दिव्यांग असल्याचं सांगितलं होतं. ही पोस्ट शेअर केल्यानंतर अनेक संकूचित मनोवृत्तीच्या लोकांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्यावर इरा सिंघल यांनी ट्रोलर्सना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (UPSC Success Story) त्यांनी म्हटले आहे की, जग खूप दयाळू असल्यामुळं दिव्यांग लोकांना काहीच संघर्ष करावा लागत नाही, असं अनेकांना वाटतं. मी फक्त माझ्या इन्स्टाग्रामवरच्या कमेंटची एक पोस्ट शेअर करत आहे. हा सायबर बुलिंगचा चेहरा आहे. सुदैवानं ही कमेंट करणारा एक तरुण असून, त्याला सिव्हिल सर्व्हिसेसमध्येच यायचे आहे. त्यामुळे आपल्याला सर्वसमावेशी शाळांची गरज आहे. आपल्याला आपल्या शिक्षण व्यवस्थेवर लक्ष द्यायला हवे. ज्यामुळे आपण एक चांगली व्यक्तीमत्वं घडवू शकू.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com