UPSC Success Story : IAS होण्यासाठी दोन वर्षाच्या मुलापासून राहिली दूर; वाचा जिद्दी महिलेची कहाणी

करिअरनामा ऑनलाईन । देशभरातील लाखो तरुण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच UPSC परीक्षेची तयारी करीत असतात. (UPSC Success Story) या परीक्षेत यश मिळवण्यासाठी कधी कधी जिद्द, चिकाटी याबरोबर त्याग करण्याचीही तयारी ठेवावी लागते. याचं एक उत्तम उदाहरण आहे हरियाणातील अनु कुमारी या IAS अधिकारी महिलेचं. हिने यूपीएससी परीक्षेत संपूर्ण देशातून दुसरा रॅंक पटकावला आहे. यासाठी तिने प्रचंड मेहनत तर घेतलीच पण त्याचबरोबर आपल्या मुलांपासून दूर राहून परीक्षेची तयारी करावी लागली आहे. जाणून घेऊया अनु कुमारी यांच्या संघर्षाविषयी…

कोण आहे अनु कुमारी –

अनु कुमारी हि हरियाणातील सोनीपतची रहिवासी. 207 मध्ये तीने UPSC परीक्षेत दुसरा क्रमांक पटकावला होता. तिची यशोगाथाही खूप रंजक आहे. अनुने दिल्लीच्या डी. यू. कॉलेजमधून भौतिकशास्त्रात पदवी घेतली. त्यानंतर तिने एम. बी. ए. चे शिक्षण घेतले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने मुंबईतील ICICI बँकेत नोकरीही स्वीकारली. 2012 मध्ये अनुने गुरुग्रामला येऊन लग्न केले. तिचा एका बिझनेशमनशी विवाह झाला आहे. लग्नानंतर त्यांना एक मुलगा हि झाला. UPSC च्या मध्यमातून प्रशासकीय सेवेत जाण्याचं स्वप्न अनुला स्वस्थ बसू देत नव्हतं. त्यामुळं तीने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. कारण अनु कुमारी यांचं भवितव्य काही वेगळंच होतं.

आधी आर्थिक बाजू बळकट करायची – (UPSC Success Story)

अनुला तिच्या मित्रांनी नागरी सेवा परीक्षेची तयारी करण्याचा सल्ला दिला होता. असे असले तरीही अनुने प्रथम तिची आर्थिक बाजू बळकट करण्याचे ठरवले. त्यामुळे ती बँकेत नोकरी करत होतीच आणि त्यातून वेळ काढून नागरी सेवेची तयारी करण्यासाठी ती अभ्यासासाठी वेळ काढायची. UPSC परीक्षा क्रॅक करण्याचा ठाम निश्चय अनुने केला होता. यादरम्यान अनुचे नातेवाईक आणि कुटुंबीयांनीहि तिला प्रोत्साहन दिले.

२ वर्षे मुलापासून राहिली दूर  –

UPSC च्या तयारीसाठी कठोर परिश्रम आणि त्याग दोन्ही आवश्यक आहे. याचे उदाहरण अनु कुमारीच्या प्रवासात पाहायला मिळते. परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्यासाठी अनु जवळपास दोन वर्षांपासून तिच्या मुलापासून दूर होती. पहिल्याच प्रयत्नात ती अयशस्वी ठरली. मात्र तिने हार न मानता पुन्हा तयारी केली आणि यश खेचून आणले. अनु कुमारीने 2017 साली UPSC ने घेतलेल्या परीक्षेत संपूर्ण देशातून द्वितीय क्रमांक पटकावला आणि ती IAS अधिकारी झाली.

अनु कुमारीचा तरुणांसाठी संदेश –

“मेहनत आणि पूर्ण समर्पणानेच यश मिळवता येते. (UPSC Success Story) तयारीच्या वेळी समाजातील लोक विविध मार्गांनी तुमचा मनोधैर्य खचवण्याचा प्रयत्न करतील. मात्र तुम्हाला तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे लागेल. योग्य रणनीती बनवून आणि कठोर परिश्रम केल्याने तुमचे ध्येय साध्य होऊ शकते”; असेही ती सांगते.

बारा तास अभ्यास –

लग्नानंतर अनु पतीसह दिल्लीत राहत होती . नोकरी सोडून पूर्णवेळे UPSC करण्याचा निर्णय घेतल्यानंतर तीने आपल्या मुलापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. अनुने मुलाला आपल्या आई-वडिलांकडं पाठवलं आणि ती आपल्या मावशीच्या गावी पुरखास इथं जाऊन अभ्यास करू लागल्या. (UPSC Success Story) अनु सांगते , “त्यावेळी माझा मुलगा केवळ दीड वर्षांचा होता. जेव्हा मी आईजवळ राहायचे तेव्हा जवळच्या एका लायब्ररीमध्ये अभ्यास करायचे. घरी यायचे तेव्हा मुलगा विवानला माझी गरज असल्याचं वाटायचं. त्याच्या ओढीमुळे मी अभ्यासापासून दूर जात आहे; असं वाटायला लागल्यानंतर मी विवानला दुसरीकडे ठेवण्याचा निर्णय घेतला.” अनु रोज 10 ते 12 तास अभ्यास करायची. पण, अभ्यासापेक्षा मुलापासून दूर होणं, खूप अवघड होतं, असं ती सांगते. “कधी कधी सगळं सोडून मुलाजवळ जायची इच्छा व्हायची. पण, मी लक्ष्य ढळू देत नव्हते”; असं ती भावुक होऊन सांगते. अनु पहाटे ४ वाजता अभ्यासास सुरुवात करायची. दिवसातले १२ तास ती अभ्यास करायची.

UPSC मध्ये यश मिळवू पाहणाऱ्या उमेदवारांना ना दिवस दिसतो ना रात्र. त्यांची अभ्यासासाठी घरापासून शेकडो किलोमीटर दूर राहण्याची तयारी असते. मुलांपासून, कुटुंबापासून त्यांना दूर रहावे लागते. या मेहनतीचे फळ त्यांना निकालानंतर मिळते. या त्यागाचं आणि कष्टाचं फळ निश्चितीच अनु कुमारीला मिळालं आहे. युवा वर्गाबरोबर तमाम महिलांसाठी अनु एक मूर्तिमंत उदाहरण आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com