UPSC Success Story : सलग 4 वेळा अपयश येवूनही खचला नाही; 5 व्या प्रयत्नात UPSC मध्ये पटकावली 226 वी रॅंक

करिअरनामा ऑनलाईन। जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर काहीही करता येऊ शकतं हे धुळ्यातील अभिजीत (UPSC Success Story) पाटीलने सिद्ध करुन दाखवलं आहे. यूपीएससीच्या परीक्षेत अभिजीत पाटीलने देशभरातून 226 वा क्रमांक मिळवला आहे. या परीक्षेत चार वेळा अपयश आल्यानंतरही खचून न जाता अभिजीतने अभ्यासात सातत्य ठेवत पाचव्यांदा यश खेचून आणलं आणि आपल्या आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं.

धुळ्याच्या जयहिंद शाळेचा विद्यार्थी

अभिजीतचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण धुळ्यातील जयहिंद शाळेतून झालं. सिंहगड कॉलेजमधून त्याने मेकॅनिक इंजिनिअरिंग पूर्ण केलं. या परीक्षेमध्ये तो पहिला आला होता. पहिल्याच वर्षी त्याला कॉग्निझंट या कंपनीत नोकरी मिळाली.

नोकरीमध्ये मन लागलं नाही (UPSC Success Story)

अभिजितला पहिल्यापासूनच जिल्हाधिकारी व्हायचं होतं. त्याचे वडील सरकारी अधिकारी होते. आपल्या मुलाने तहसीलदार किंवा प्रांत अधिकारी व्हावी अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. त्यामुळे अभिजितला कॉग्निझंट कंपनीत नोकरी जरी मिळाली असली तरी अभिजीतचं मन त्यामध्ये लागत नव्हतं. मग त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि पुणे गाठलं. पुण्यामध्ये चाणक्य मंडलमध्ये त्याने अभ्यासाला सुरूवात केली.

दिल्लीमध्ये केली अभ्यासाची तयारी

काहीही करायचं पण पास व्हायचंच असा पण केलेल्या अभिजीतने नंतर दिल्ली गाठली. दिल्लीमध्ये गेल्यानंतर त्याने अभ्यासाचे नियोजन केलं. पहिल्या दोन प्रयत्नामध्ये अभिजीतच्या हाती काहीच लागलं नाही. पण निराश न होता त्याने प्रयत्न सुरूच ठेवले. तिसऱ्या प्रयत्नामध्ये त्याने मुलाखतीपर्यंत मजल मारली. तेच चौथ्या प्रयत्नावेळीही झालं. पण सलग (UPSC Success Story) दोनदा मुलाखतीपर्यंत गेलेल्या अभिजीतला पाचव्या प्रयत्नात मात्र यश मिळालं. पाचव्या प्रयत्नामध्ये अभिजीत संपूर्ण देशातून 226 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला.

वाचन आणि लिखानाची प्रचंड आवड

यूपीएससीची तयारी करताना अभिजीतचा ऑप्शनल विषय हा भूगोल होता. या विषयाचे त्याने प्रचंड वाचन आणि लिखाण केलं. तसं वाचनाची आवड त्याला लहानपणापासूनच होती. अभिजीतने आतापर्यंत अनेक कादंबऱ्या वाचल्या आहेत. मोठ्या-मोठ्या कांदबऱ्या अभिजीत बघता-बघता वाचायचा असं त्याचे वडील सांगतात.

फिटनेसप्रेमी अभिजीत

अभिजीतला फिटनेसची आवड आहे. उत्तम फिटनेस राखण्यासाठी चौरस आहार घेण्यावर त्याचा जास्त भर असतो. तसेच त्याने वजनावर चांगलंच नियंत्रण ठेवलंय. अभिजीतला लॉन टेनिसची आवड आहे. या सर्वाचा फायदा त्याला यूपीएसचीच्या अभ्यासातही झाला. याच गोष्टींमुळे अभिजीत अनेक तास सलगपणे वाचन आणि लेखण करु शकला.

आई वडिलांचा मोठा वाटा

अभिजीतच्या या यशात त्याचे वडील राजेंद्र पाटील आणि आई मंदाकिनी पाटील यांचा मोठा वाटा आहे. त्याचसोबत त्याच्या मित्रपरिवारानेही त्याला अभ्यासात साथ दिली.अभिजीतचे हे यश आज अनेकांसाठी प्रेरणादायी (UPSC Success Story) ठरणारं आहे. एका सर्वसाधारण कुटुंबातून येऊन त्याने मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर हे यश मिळवलंय. त्याच्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होतय.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com