UPSC Success Story : प्रेरणादायी!! केरळच्या कर्णबधिर जुळ्या बहिणींची IES परीक्षेत उत्तुंग झेप, वाचा एका जिद्दीची कहाणी

करिअरनामा ऑनलाईन। मनात जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट शक्य आहे, असं म्हटलं जातं (UPSC Success Story) ते खोटं नाही. केरळमधील दोन सख्या बहिणींनी हे खरं करून दाखवलं आहे. श्रवणदोष असलेल्या दोन जुळ्या बहिणींनी इंडियन इंजिनीअरिंग सर्व्हिसेसच्या परीक्षेमध्ये बाजी मारली आहे. सध्या या दोघींची चांगलीच चर्चा आहे. लक्ष्मी आणि पार्वती अशी या दोघींची नावं आहेत. IES परीक्षेत पार्वतीला 74 वी रँक मिळाली आहे, तर लक्ष्मीला 75 वी रँक मिळाली आहे. पूर्ण केरळ राज्यातून फक्त या दोन जुळ्या बहिणीच ही परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत हे विशेष म्हणावे लागेल.

तिन्ही भावंडे इंजिनियर 

लक्ष्मीचं MTech झालं असून, ती सिंचन विभागात नोकरी करत आहे. तर, पार्वती स्थानिक प्रशासन विभागात असिस्टंट इंजिनीअर (assistant Engineer) म्हणून काम करते आहे. तिला अलीकडेच केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागात असिस्टंट इंजिनीअरची नोकरी मिळाली आहे. लक्ष्मी आणि पार्वतीला विष्णू नावाचा भाऊ आहे. त्यालाही या दोघींप्रमाणे श्रवणदोष आहे. तोही PWD विभागात असिस्टंट इंजिनीअर आहे.

ऐकू येत नसल्याने कोचिंग क्लासपासून लांब (UPSC Success Story)

ही तिन्ही भावंड पाच वर्षांची होईपर्यंत अक्कुलम येथील National Institute of Speech and Hearing या विशेष शाळेमध्ये शिकली. त्यानंतर त्यांना सामान्य शाळेत टाकण्यात आलं. पुढे विष्णूने इंजिनीअरिंग केलं आणि त्याच्या पावलावर पाऊल टाकत या दोघी बहिणींनीही इंजिनीअरिंगमध्ये प्रवेश घेतला. या दोघी 2019 पासून IES परीक्षा देत आहेत मात्र यामध्ये त्यांना अपयश येत होतं. ऐकण्यात दोष असल्याने त्या कोचिंग क्लासेसला जाऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी घरी पुस्तकं आणून स्वतः अभ्यास केला. यावेळी भाऊ विष्णूने या दोघींना खूप मदत केली. अखेर आई, भाऊ आणि या दोघी बहिणी या चौघांच्या मेहनतीला यश आलं आणि या दोघी परीक्षेत उत्तीर्ण झाल्या.

पतीच्या निधनानंतर 3 कर्णबधिर मुलांचा सांभाळ 

केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीमार्फत (UPSC) घेण्यात येणारी ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी या दोन बहिणींनी खूप मेहनत घेतली. बहिरेपणा असूनही या दोघी बहिणींनी आतापर्यंत घेतलेली मेहनत पाहून त्यांची आई सीता यांना मुलींचा अभिमान वाटतो. बहिरेपणा असलेल्या या तीन भावंडाना आई सीताने एकटीने वाढवलं. 23 वर्षांपूर्वी पतीचं (UPSC Success Story) निधन झाल्यापासून सीता यांना श्रवणदोष असलेल्या आपल्या तीन मुलांचं संगोपन करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. सीता यांना पीडब्ल्यूडीमध्ये (PWD) नोकरी मिळेपर्यंत जीवनात खूप संघर्ष करावा लागला. National Institute of Speech and Hearing आणि नातेवाईकांने या तिन्ही भावंडांच्या श्रवणयंत्रासह शैक्षणिक खर्च व इतर खर्च पूर्ण केला.

हे पण वाचा -
1 of 35

मुलं उच्च पदावर पोहचल्याचा आनंद 

“मला श्रवणदोष असलेल्या माझ्या मुलांचं संगोपन करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. माझी आई आणि माझ्या सुनेलाही श्रवणदोष आहे, त्यांनाही कमी ऐकू येतं. माझ्या पतीच्या निधनानंतर पाच वर्षांनी मला नोकरी मिळाली. तोपर्यंत इतरांच्या मदतीने जगावं लागत होतं. आता, माझी तिन्ही मुलं मेहनत करून चांगल्या पदांवर पोहोचली आहेत, याचा मला खूप आनंद आहे,” असं लक्ष्मी आणि पार्वतीची आई सीता यांनी सांगितलं.

‘शारीरिक अपंगत्व स्वप्नं नष्ट करू शकत नाही’

“परीक्षा आणि मुलाखत कठीण होती आणि आम्हाला आशा नव्हती की आम्ही पास होऊ. पण रिझल्ट कळाल्यानंतर आम्हाला खूप आनंद झाला. आम्हाला ऐकू येत नाही म्हणून आम्ही कोचिंग क्लासला जाऊ शकलो नाही, त्यामुळे (UPSC Success Story) आम्ही पुस्तकं विकत घेऊन स्वतः नोट्स तयार केल्या. शारीरिक अपंगत्व कधीही एखाद्याची स्वप्नं नष्ट करू शकत नाही आणि आम्ही आमच्या स्वप्नांचा पाठलाग करत राहू,” असं लक्ष्मीनी सांगितलं. या दोन बहिणी आणि त्यांचा भाऊ यांच्या जिद्दीची कहाणी नक्कीच देशातील अनेक धडधाकट तरुणांनाही प्रेरणा देईल.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com