“UPSC/MPSC देत असाल तर पुढील २० गोष्टी लक्षात ठेवा…”

Get real time updates directly on you device, subscribe now.

स्पर्धापरिक्षा अभ्यासनीती | नितिन बऱ्हाटे

१. UPSC/MPSC च्या परिक्षांची तयारी करणे म्हणजे स्वतःतील उत्तमाचा ध्यास तसेच स्वतःच्या क्षमतांचा सर्वोत्तम शोध होय.
Preparing for UPSC/MPSC is nothing less than ‘Exploring your best’ and ‘cheaking potential at Apex’

२. दिलेल्या वेळेत अभ्यास पुर्ण करणाराच IAS होऊ शकतो. उपलब्ध वेळ, योग्य रणनीती आणि प्रश्न सराव या गोष्टीच परिक्षा उत्तीर्ण करुन देतील.
The one who finishes activity within Timeframe, will be next IAS.

३. काॅलेज डिग्रीचा अभ्यास आधीच्या आठवड्यात होऊ शकतो परंतु UPSC चा अभ्यास वर्षभर सातत्याने करणे अपेक्षित आहे.
The degree study can be wind up in last night but UPSC Study needs daily consistent study for full year.

४. UPSC च्या प्रत्येक विषयाचा अभ्यास ‘सामान्य’ असावा, ज्यात बहुतेक सर्व घटकांचा समावेश असावा. उदा. सुर्यासहित सुर्याखालील सर्व. प्रत्येक विषयाच्या खोलात जायची आवश्यकता नाही. संक्लपनेचे चतुरस्त्र आकलन मात्र असावे.
UPSC study should be “general” in nature, which covers everything under the Sun including the Sun”

५. ज्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे विस्तृत विश्लेषण केले आहे त्यांना अभ्यासाची योग्य दिशा सापडायला मदत होते.
one who did analysis of previous years question papers thoroughly, will surely finds correct direction for UPSC study

६. “आक्रमकतेने अद्ययावत राहणे” हे खऱ्या UPSC परीक्षार्थीचं लक्षण आहे.
“Being aggressively updated” is true character of genuine UPSC Aspirant.

७. UPSC साठी निबंध, नीतिशास्त्र व वैकल्पिक विषय आणि MPSC साठी HRD या विषयांना मुख्य परिक्षेत गुण जास्त मिळवले तरच मनपसंद पोस्ट मिळते.
If you score well ,In Essay, Ethics and Optional subject for UPSC mains and HRD subject for MPSC mains there are highest possibilities of higher rank.

८. UPSC/MPSC च्या गुणवत्ता यादीत येण्यासाठी खुप मोठ्या सातत्य आणि संयमाची आवश्यकता आहे.
संयम- किमान २ वर्ष सातत्याने व योग्य दिशा आखून अभ्यास करण्याचा सराव हवा.
ज्याच्याकडे संयम आणि आक्रमकता एकाचवेळी आहेत ते UPSC परिक्षा उत्तीर्ण होऊ शकतात
Every year 99% Aspirants has to face failure, need “a great Patience”.
(low vacancy v/s high application)
The who gives absolute dedication will definitely become IAS/IPS.
The Aspirant who have Patience and Aggression at a same time, will crack UPSC exam

९. प्रत्येक घटक चतुरस्त्र दृष्टिकोनातून पुर्ण करीत राहणे अपेक्षित आहे. चालु घडामोडी आणि मुळ घटक यांची सांगड घालून अभ्यास करणे गरजेचे आहे.
The one who can think for one issue/Subject with multiple aspects, can become IAS/IPS

हे पण वाचा -
1 of 20

१०. UPSC अभ्यास पुढे न ढकलणारे परीक्षार्थी नक्की IAS/IPS साठी निवडले जाऊ शकतात. या अभ्यासात नोट्स काढणे अनिवार्य नाही. प्रत्येक विषयाचे अभ्यास साहित्य ठराविक असावे.
The one who don’t postpone study activity will definitely get selection for IAS /IPS

११. व्यक्तिमत्व चाचणीची तयारी आपल्या जन्मापासुनच सुरू झालेली असते आपल्याला फक्त नैसर्गिक राहुन अजून उत्तमता आणायची आहे.
UPSC Personality Test preparation for strat from our birth, we just need to give it edge.

१२. स्पर्धा परीक्षांच्या GS ची तयारी कधी न संपणारी आहे, अपेक्षित अभ्यासक्रम पुर्ण करुनच यशाचा मार्ग शोधावा लागतो.
GS of competitive exam is unending ride of ocean, where u need to catch correct path and sail through it.
GS- General Studies(सामान्य अध्ययन)

१३. आकलन, निर्णयसंतुलन, अचुकता आणि वेग हे सर्व CSAT पेपरचे मुख्य घटक आहेत
Comprehension, balance of judgement, accuracy and speed are main pillars of CSAT paper
( CSAT – Civil services Aptitude Test)

१४. चिकित्सक आणि सर्जनशील विचार एका प्रवाहात साहित्यिक भाषेत मांडणे UPSC/MPSC च्या निबंधलेखनात अपेक्षित असते.
Critical and creative thinking presenting in flow with literary form is basic need of essay in UPSC/MPSC.

१५. बेसिक संकल्पना स्पष्ट असणाऱ्या परीक्षार्थीची UPSC/MPSC ची पूर्व परिक्षा सहज निघते. परीक्षार्थीच्या महत्त्वाच्या फॅक्ट्स पाठ असाव्यात.
The one has clearity over all concepts will crack prelim exam easily. Important facts of study should memories by Aspirant.

१६. आॅनलाईन व्हिडीओज मध्ये रेंगाळण्यापेक्षा पेपर आणि पेन घेऊन विचार करुन प्रत्यक्ष सराव केल्याशिवाय मुख्य परिक्षेला गुण मिळत नाहीत.
Instead of lost out in videos found yourself in extensive writting on peper with pen after brainstorming on imp issues.

१७. एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे म्हणजे फोकस नाही तर एकाचवेळी इतर खुप गोष्टींना नाही म्हणणे म्हणजे फोकस होय.
Focus is not keeping eye on one thing, but strongly saying no to many other things.

१८. IAS/IPS परीक्षार्थीचा दृष्टिकोन पक्षपाती नसावा. विचार विवेकनिष्ठ आणि आचरण संविधानिक, मुल्याधारित असावे.
IAS Aspirants Perspective should be Unbiased

१९. योग्य मार्गदर्शकाशिवाय कोणाताच परीक्षार्थी UPSC/MPSC परिक्षा पास होऊ शकत नाही. मार्गदर्शन आणि स्व मेहनत या आधारावर पास होणे शक्य आहे.
No Aspirant can clear UPSC/MPSC without a genuine mentor.

२०. सर्वस्व झोकुन देणारेच IAS/IPS होऊ शकतात.
Absolute dedication and 100 % commitment will definitely amaze you with Class One Service.

Get real time updates directly on you device, subscribe now.