UPSC Main Exam 2019 Result जाहीर; पहा संपूर्ण मेरीट लिस्ट

टीम करिअरनामा | युपीएससी (Union Public Service Commission) परीक्षेचा ‘मेन्स परीक्षा 2019’ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. च्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच upsc.gov.in वर जाहीर करण्यात आला आहे. संघ लोक सेवा आयोगाकडून मेन्सची परीक्षा सप्टेंबर 20 ते 29, 2019 दरम्यान घेण्यात आली होती. जे परीक्षार्थी मेन्सची परीक्षेचा टप्पा यशस्वी पणे पार पाडतात त्यांना मुलाखतीसाठी (Interview Round) बोलवले जाते. दरम्यान मुलाखती यंदा फेब्रुवारी 2020 मध्ये होणार असून कॉल लेटर जानेवारी 27, 2020 पासून रिलिज होण्यास सुरूवात होणार आहेत.

UPSC Main Exam 2019 चा निकाल कसा पहाल?

UPSC चं अधिकृत संकेतस्थळ upsc.gov.in वर क्लिक करा.

त्यानंतर ‘written result- civil services main’वर क्लिक करा.

त्यानंतर एक पीडीएफ फाईल ओपन होईल.

तुमचा रोल क्रमांक जाहीर करण्यात आलेल्या मेरीट लिस्टमध्ये पाहता येईल.

सिव्हिल सर्विस एक्झाम मध्ये विद्यार्थ्यांना तीन टप्प्यांमधून जावं लागतं. यामध्ये प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू अशा तीन टप्प्यांमध्ये विद्यार्थ्यांचे गुण पाहता अंतिम निकाल जाहीर केला जातो. दिल्लीच्या युपीएससी ऑफिसमध्ये या मुलाखती पार पडल्या आणि त्यानंतर निकाल जाहीर करण्यात येतो.