भारतीय आर्थिक सेवा (IES) परीक्षेची अधिसूचना जारी

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाने भारतीय आर्थिक सेवा (IES) परीक्षेची अधिसूचना जारी केली आहे. भरतीसाठी संयुक्त प्रवेश परीक्षा 16 ऑक्टोबर 2020 पासून सुरू होणार आहे. यूपीएससी आयईएस परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज 1 सप्टेंबर पर्यंत करता येऊ शकतील. ऑनलाइन अर्जांसंबंधी विस्तृत निर्देश आयोगाच्या अधिसूचनेत आहेत. ऑनलाइन अर्ज 8 सप्टेंबर 2020 ते 14 सप्टेंबर 2020 या कालावधीत मागे घेतले जाऊ शकतील. अधिकृत वेबसाईट –  upsc.gov.in

ही परीक्षा अहमदाबाद, जम्मू, बंगळुरू, कोलकाता, भोपाळ, लखनऊ, चंदीगड, मुंबई, चेन्नई, पटणा, कटक, प्रयागराज, दिल्ली, शिलाँग, दिसपूर, शिमला, हैदराबाद, तिरुवनंतपुरम आणि जयपूरमध्ये आयोजित केली जाणार आहे.

यूपीएससी आयईएस 2020 परीक्षेच्या माध्यमातून 15 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. upsconline.nic.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करता येतील. ऑनलाइन अर्ज कसा करायचा त्याबाबतची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

असा करा अर्ज – 

1 ) सर्वात आधी UPSC चे अधिकृत संकेतस्थळा upsc.gov.in वर जा.

2 ) आता होम पेजवर what’s new मध्ये जाऊन ‘Exam Notification: Indian                 Economic Service Examination, 2020’ वर क्लिक करा.

3 ) यानंतर पार्ट 1 रजिस्ट्रेशनवर क्लिक करा आणि विचारलेली माहिती भरा.

4 ) आता पार्ट 2 रजिस्ट्रेशनवर क्लिक करा आणि फोटो, स्वाक्षरी अपलोड करा व शुल्क भरा आणि आपले परीक्षा केंद्र निवडा.

5 ) यानंतर I agree पर्यायावर क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in 

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com