UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2019 चा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. मुख्य परीक्षा सप्टेंबर 2019 मध्ये झाली होती, तर मुलाखती फेब्रुवारी आणि ऑगस्ट 2020 मध्ये घेण्यात आल्या होत्या. यशस्वी उमेदवारांची यादीदेखील केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केली आहे.

प्रदीप सिंह या उमेदवाराने यूपीएससी नागरी सेवा परीक्षेत (मेन्स) 2019 प्रथम क्रमांक पटकावला आहे तर जतीन किशोर आणि प्रतिभा वर्मा अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. एकूण 829 उमेदवारांना नियुक्ती देण्याची शिफारस करण्यात आली आहे.

पुढील केंद्रीय सेवांमधील जागांसाठी या परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यात येईल –

1) भारतीय प्रशासकीय सेवा
2) भारतीय परराष्ट्र सेवा
3) भारतीय पोलीस सेवा
3) केंद्रीय सेवांमधील गट ‘अ’ आणि गट ‘ब’

नियुक्ती मिळणार असलेल्या उमेदवारांचा प्रवर्गनिहाय तपशील पुढीलप्रमाणे-

सर्वसाधारण गट – 304
आर्थिक वंचित गट – 78
इतर मागासवर्गीय -251
एससी -129
एसटी – 67

केंद्रीय लोकसेवा आयोगाने  भारतीय वन सेवा २०१९ चे गुण यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

गुण यादी डाउनलोड करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com