UPSC EPFO उमदेवारांना परीक्षाकेंद्र बदलण्याची मुभा

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन ।केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेत एनफोर्समेंट ऑफिसर किंवा अकाउंट्स ऑफिसर पदांसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केला होता, त्यांच्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे. या उमेदवारांना परीक्षा केंद्रासाठी आपले पसंतीक्रम बदलण्याची परवानगी देण्यात आली आहे. UPSC EPFO परीक्षा ९ मे २०२१ रोजी होणार आहे.

उमेदवारांना आपला परीक्षा केंद्राचा पर्याय बदलण्यासाठी विंडो दोन टप्प्यात उघडण्यात येणार आहे. पहिला टप्पा १५ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२० पर्यंत असेल आणि दुसरा टप्पा २९ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत असेल.

UPSC ने सांगितलं आहे की देशभरात ७२ परीक्षा केंद्रांवर परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. UPSC EPFO परीक्षेसाठी उमेदवारांना २ तासांचा वेळ दिला जाईल. परीक्षा वस्तुनिष्ठ प्रकारची असेल आणि परीक्षेत हिंदी आणि इंग्रजी अशा दोना भाषांमध्ये प्रश्न विचारले जातील. लेखी परीक्षेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. परीक्षा आणि मुलाखतीचे बलाबत ७५:२५ असेल. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून ४२१ पदे भरली जाणार आहेत.या भरती संदर्भात जानेवारी २०२० मध्ये नोटिफिकेशन जारी करण्यात आले होते आणि नंतर करोना व्हायरसमुळे अनेक लोकांना स्थलांतर केले. परिणामी उमेदवारांनी परीक्षा केंद्र बदलून देण्याची विनंती केली होती.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.