BREAKING NEWS: यूपीएससी नागरी सेवा- पूर्व परीक्षा लांबणीवर! ‘या’ तारखेला होणार पूर्व परीक्षा

करिअरनामा ऑनलाईन | करोणाच्या दुसऱ्या लाटेने देशभरामध्ये थैमान घातले आहे. यामुळे देशभरातील वेगवेगळ्या परीक्षा एकतर रद्द केल्या आहेत किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. देशातील अतिशय प्रतिष्ठित आणि कठीण समजली जाणारी युपीएससी नागरी सेवा परीक्षा आता लांबणीवर पडली आहे. यूपीएससी नागरी सेवा- पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही परीक्षा 10 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात येईल.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने पूर्व परीक्षा 27 जून 2021 मध्ये घेण्याचे पूर्वनियोजित होते. परंतु, देशभरामध्ये वाढलेल्या करोना रुग्ण संख्येमुळे आणि सध्या कोलमडून पडलेल्या वैद्यकीय कारणामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आता ही परीक्षा 10/10/2021 रोजी घेण्यात येईल.

देशभर रामधून लाखो विद्यार्थी या परीक्षेची तयारी करत असतात. देशभरामधून जवळपास आठ ते दहा लाख विद्यार्थी दरवर्षी या परीक्षेला अर्ज करतात. यामुळे देशातील सर्वात मोठ्या परीक्षेपैकी एक ही परीक्षा समजली जाते. त्यामुळे, देशभरातील करोणा स्थिती लक्षात घेता परीक्षा पुढे ढकलेल की नियोजित तारखेलाच परीक्षा होईल याबाबत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असलेला संभ्रम यामुळे दूर झाला आहे.

 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp 

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com