UPSC Calendar 2023: यूपीएससी कडून परीक्षा कॅलेंडर जाहीर; पहा परीक्षांच्या तारखा…

करिअरनामा ऑनलाईन। UPSC परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी आहे (UPSC Calendar 2023). आयोगाने शैक्षणिक सत्र 2023 साठी वार्षिक परीक्षा कॅलेंडर जाहीर केले आहे. यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवरील नोटिफिकेशननुसार, नागरी सेवा परीक्षा (प्राथमिक) दि. 28 मे रोजी घेतली जाणार आहे. या परीक्षेचे नोटिफिकेशन दि. 1 फेब्रुवारी 2023 रोजी जाहीर केले जाणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना दि. 21 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे.

कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांत याआधी वार्षिक परीक्षांचे कॅलेंडर बदलण्यात आले होते. सध्या UPSC कडून या तारखा जाहीर करण्यात आल्या असल्या तरी त्यामध्ये परिस्थितीनुसार बदलही होऊ शकतात असं आयोगानं म्हटलं आहे. (UPSC Calendar 2023)

UPSC इंजिनीअरिंग सेवा Preliums परीक्षा दि. 14 सप्टेंबर 2022 रोजी घेण्यात येणार असून परीक्षेसाठी दि. 4 ऑक्टोबर 2022 पर्यंत अर्ज करता येणार आहे. ही परीक्षा दि. 19 फेब्रुवारी 2022 रोजी घेतली जाणार आहे. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, संयुक्त भू-वैज्ञानिक प्राथमिक परीक्षा (UPSC Calendar 2023) दि. 19 फेब्रुवारी 2023 रोजी घेतली जाणार असून दि. 21 सप्टेंबर 2022 पासून अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे. उमेदवारांना दि. 11 ऑक्टोबर 2022 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

असे तपासा परीक्षेचे वेळापत्रक: (UPSC Calendar 2023)

  • UPSC ची अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा.
  • पुढे, ‘UPSC Calendar 2023’ लिहिलेल्या सूचना लिंकवर क्लिक करा.
  • एक पीडीएफ ओपन होईल.
  • विविध भरती परीक्षा आणि इतर नोटिफिकेशन मधील तारखा तपासा.
  • त्यानंतर यूपीएससी कॅलेंडर 2023 डाउनलोड करा.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com