UPSC Bharti 2021। परीक्षा न देता नोकरीची संधी; 296 पदांसाठी थेट मुलाखतीतून होणार भरती

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत कोणत्याही लेखी परीक्षेविना केंद्र सरकारची नोकरी मिळवून देण्याची संधी देत आहे. यूपीएससीने अनेक रिक्त पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या रिक्त पदांची अधिसूचना आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर upsc.gov.in वर देण्यात आली आहे. UPSC Bharti 2021

पदांचा सविस्तर तपशील – 

डेटा प्रोसेसिंग असिस्टंट – ११६ पदे (पे स्केल – लेवल ७)

असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर – ८० पदे (पे स्केल – लेवल ८)

ज्युनियर टेक्निकल ऑफिसर – ६ पदे (पे स्केल – लेवल ७)

स्पेशलिस्ट ग्रेड ३ असिस्टेंट प्रोफेसर – ४५ पदे (पे स्केल – लेवल ११)

लेक्चरर (मेडिकल सोशल वर्क) – १ पद (पे स्केल – लेवल १०)

असिस्टेंट डायरेक्टर (फिशिंग हार्बर) – १ पद (पे स्केल – लेवल १०)

पदसंख्या  – २९६ पदे

पात्रता –  कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर अॅप्लिकेशन (एमसीए), आयटी ते अभियांत्रिकी, बीई (बीटी / बीटेक), वैद्यकीय (एमबीबीएस), कायद्याची (एलएलबी / एलएलएम) पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

वयाची अट – 

डेटा प्रोसेसिंग सहाय्यक, सहाय्यक सरकारी वकील, कनिष्ठ तांत्रिक अधिकारी –  ३० वर्षे

व्याख्याता आणि सहायक संचालक –  ३५ वर्षे

उमेदवार विशेषज्ञ सहाय्यक प्रोफेसर – ४०  वर्ष

ओबीसी प्रवर्गात सर्व पदांसाठी ३ वर्षे आणि एससी, एसटीला  प्रवर्गातील सर्व पदांसाठी ५ वर्षांची सवलत देण्यात येणार आहे. UPSC Bharti 2021

शुल्क – जनरल, ओबीसी, आर्थिक दुर्बल प्रवर्गातील उमेदवारांसाठी २५ रुपये अर्ज शुल्क आहे. इतर प्रवर्गांसाठी अर्ज शुल्क नाही.

अर्ज असा करा – यूपीएससीचे अधिकृत वेबसाईट  upsconline.nic.in वर जाऊन किंवा पुढील दिलेल्या अप्लिकेशन लिंकवर क्लिक करुन अर्ज करता येईल.

निवड प्रक्रिया – 

पात्र उमेदवारांची निवड केवळ मुलाखतीच्या आधारे केली जाईल. प्राप्त झालेल्या अर्जाच्या आधारे शॉर्टलिस्ट करून उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मात्र यूपीएससीने म्हटले आहे की अर्जांची संख्या जास्त असल्यास शॉर्टलिस्टिंगसाठी परीक्षा घेतली जाऊ शकते. म्हणून, अर्ज करताना संबंधित सर्व आवश्यक माहिती आणि कागदपत्रे सादर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. UPSC Bharti 2021

अर्ज करण्याची अंतिम तारीख – ११ फेब्रुवारी २०२१

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – upsconline.nic.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com