राज्यातील कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी!! परीक्षा ऑफलाईनच होणार…

करिअरनामा ऑनलाईन । गेली दोन वर्ष ऑनलाईन शिक्षण घेतल्यामुळे ऑफलाईन परीक्षेला विद्यार्थ्यांचा विरोध होता. मात्र राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनंच घेण्यात येणार आहेत यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे.

यापूर्वी उच्च शिक्षणमंत्री आणि कुलगुरू यांच्या बैठकीच्या आधीच नागपूर विद्यापीठानं ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक घेऊन परीक्षांचा आढावा घेतला होता. त्यात त्यांनी सर्व विद्यापीठांमध्ये ऑफलाइन परीक्षा घेण्याबाबत सूचना केली होती. मात्र या निर्णयाला अनेक दिवस उलटून गेल्यानंतरही कोणत्याही विद्यापीठाकडून याबाबत ठोस निर्णय झाला नव्हता. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात होते.

लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव सुटला. तसंच ऑनलाईन अभ्यासही योग्यप्रकारे होऊ शकला नाही. परीक्षेत कोरोना संसर्गाचा धोका विद्यार्थ्यांना वाटत होता. त्यामुळे परीक्षा रद्द करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली. त्यासाठी निरनिराळ्या विद्यापीठात विद्यार्थ्यांनी आंदोलनही केलं होतं. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

अखेर काही दिवसांपूर्वी नागपूर, गोंडवाना आणि लातूर विद्यापीठांनी MCQ सह ऑफलाईन परीक्षा घेण्याचं निश्चित केलं होतं. इतर कोणत्याही विद्यापीठांचा अशा पद्धतीनं परीक्षा घेण्याबाबत निर्णय आला नाही. काही विद्यापीठांनी लेखी परीक्षा घेण्याचाही निर्णय घेतला आहे. मात्र यामुळे राज्यातील निरनिराळ्या विद्यापीठांच्या परीक्षा निरनिराळ्या पद्धतीनं होतील. तसंच परीक्षांचे निकालही निरनिराळ्या पद्धतीनं लागतील. हे विद्यार्थ्यांसाठी बरोबर नाही हे कोर्टाच्या लक्षात आलं आहे.

म्हणूनच राज्यातील सर्व विद्यापीठांनी सर्व परीक्षा सर्व पद्धतीनंच घ्याव्यात असा निकाल उच्च न्यायालयानं दिला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर होऊन एकमतानं आणि एकाच पद्धतीनं परीक्षा होणार आहेत.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com