Unique Career Options : करिअरचा एक उत्तम पर्याय; Green Job म्हणजे नक्की काय? इथे मिळेल संपूर्ण माहिती

करिअरनामा ऑनलाईन। ग्रीन जॉब्ज अर्थात हरित रोजगार ही संकल्पना तुम्हाला माहित आहे का? हवामान (Unique Career Options) बदलाचे गंभीर परिणाम दिसू लागल्यावर जगातील अनेक देश पर्यावरणाविषयी जागरूक झाले आहेत. पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी विविध प्रकल्प हाती घेतले जात आहेत. त्याच माध्यमातून नवीन रोजगारही उपलब्ध होतो आहे. त्याला ग्रीन जॉब्ज अर्थात हरित रोजगार असं म्हटलं जातं. चीन, अमेरिका, युरोपमधल्या देशांच्या बरोबरीनं भारतातही अशा प्रकारच्या रोजगारांची निर्मिती होते आहे. गेल्या वर्षभरात ग्रीन जॉब्जच्या क्षेत्रात देशात जवळपास 9 लाख नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. भविष्यातही या क्षेत्रात भरपूर रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यात सरकारी नोकऱ्याही असतील. आज आम्ही तुम्हाला Green Job या क्षेत्राविषयी ओळख करून देणार आहोत.

ग्रीन जॉब्ज म्हणजे नक्की काय? (Unique Career Options)

पर्यावरण रक्षणाच्या दिशेनं काम करणारी जी क्षेत्रं आहेत, त्यात मिळणाऱ्या नोकऱ्यांना ‘ग्रीन जॉब’ म्हणतात. उदा. सोलर एनर्जी, रिन्युएबल एनर्जी, हायड्रोपॉवर या क्षेत्रातील नोकऱ्या ग्रीन जॉब्ज अंतर्गत येतात. हरित ऊर्जेच्या क्षेत्रात उपलब्ध रोजगार ग्रीन जॉब्ज म्हणवला जातो.

रिन्युएबल एनर्जीच्या क्षेत्रात जो रोजगार निर्माण होतो आहे, त्यात वेगानं विकसित होणारं क्षेत्र सोलर फोटोव्होल्टिकचं आहे. त्याच्या खालोखाल विंड एनर्जी, हायड्रोपॉवर आणि मग बायोएनर्जी हे आहे. रिपोर्टमधील (Unique Career Options) आकडेवारीनुसार, 2021-22मध्ये भारतात 2.17 लाख नोकऱ्या सोलर फोटोव्होल्टिक या क्षेत्रात देण्यात आल्या, तर 4.14 लाख नोकऱ्या हायड्रोपॉवरमध्ये निर्माण झाल्या.

34 लाख नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता

इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आणि इंटरनॅशनल रिन्युएबल एनर्जी या दोन संस्थांनी यंदाचा वार्षिक अहवाल दिला आहे. त्यात जगातील विविध देशांमधील ग्रीन जॉब्जविषयी आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या आकडेवारीनुसार, जगातील ग्रीन जॉब्जमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. जगभरात 2020-21मध्ये 1 कोटी 27 लाख ग्रीन जॉब्ज (Unique Career Options) निर्माण झाले होते. यात 63.6 टक्के इतका मोठा वाटा आशियाई देशांचा होता. सर्वांत जास्त रोजगार चीनमध्ये उपलब्ध झाला. तिथे 54 लाख नोकऱ्या निर्माण झाल्या. या आकडेवारीनुसार, 2030 पर्यंत भारतात हरित क्षेत्रात 34 लाख नोकऱ्या निर्माण होतील, असा अंदाज आहे.

अशी निर्माण होईल रोजगाराची संधी

देशातील उत्पादन वाढवण्यासाठी भारतानं एप्रिल 2022 पासून सगळ्या मोड्युल्सच्या आयातीवर 40 टक्के आणि विक्रीवर 25 टक्के कर लादला आहे. या क्षेत्रातील उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक मदतही (PLI) दिली जाणार आहे. हरित ऊर्जेबाबतचे प्रकल्प विकसित करणाऱ्या व्यक्तींना ही आर्थिक मदत दिली जाईल. याचाच अर्थ या क्षेत्रातील उत्पादन (Unique Career Options) वाढण्यासाठी कंपन्या सुरू होतील. त्यामुळे रोजगाराच्या संधीही निर्माण होतील. पर्यावरण रक्षणाच्या दिशेने विविध प्रकल्प हाती घेत रोजगाराच्या संधीही उपलब्ध होत असल्याने देशाच्या विकासालाही हातभार लागतो आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com