UGC NET Exam 2023 : UGC ने जाहीर केली परीक्षेची तारीख; ‘या’ तारखेपासून सुरु होणार फेज 1 परीक्षा

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सहाय्यक (UGC NET Exam 2023) प्राध्यापक, कनिष्ठ संशोधन फेलोशिप आणि सहाय्यक प्राध्यापकांसाठी यूजीसी नेट 2023 परीक्षेसाठी पहिल्या टप्प्याच्या परीक्षेचे वेळापत्रक आज जाहीर केले आहे. उमेदवार UGCच्या अधिकृत वेबसाईटवर ugcnet.nta.nic.in परीक्षेचे वेळापत्रक पाहू शकतात. UGC ने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार देशभरातील ठराविक केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
यूजीसी नेट परीक्षा 83 विषयांसाठी 13 जून ते 17 जून 2023 दरम्यान सीबीटी पद्धतीने घेण्यात येईल. ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये होणार आहे. 13 जून रोजी वाणिज्य, शारीरिक शिक्षण आणि ग्रंथालय व माहिती विज्ञान या विषयांच्या पेपरने ही परीक्षा सुरू होणार आहे. 17 जून रोजी संगणक विज्ञान व अनुप्रयोग, हिंदी आणि समाजशास्त्र विषयाने ही परीक्षा संपणार आहे. ही परीक्षा कोणत्या शहरात होईल हे अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही.

एनटीए लवकरच एग्जाम सिटी इंटिमेशन स्लिप आणि (UGC NET Exam 2023) प्रवेश पत्र जारी करेल. नोंदणीकृत उमेदवार त्यांच्या अर्ज क्रमांकाचा वापर करून अधिकृत वेबसाइटद्वारे डाउनलोड करू शकतात. प्रवेशपत्राशिवाय उमेदवारांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.

असा तपसा UGC NET 2023 परीक्षेचा दिनांक (UGC NET Exam 2023)
1. उमेदवार ugcnet.nta.nic.in अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
2. UGC NET 2023 जून टप्पा 1 परीक्षेचे वेळापत्रक होम पेजवरील लिंकवर क्लिक करा.
3. परीक्षेचे वेळापत्रक तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
4. चेक करा आणि प्रिंट आऊट घ्या.
या परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 10 मे 2023 पासून सुरू होवून 31 मे 2023 पर्यंत चालली. अर्जातील दुरुस्तीसाठी उमेदवारांना 2 जून ते 3 जून 2023 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com