UGC NET चा निकाल जाहीर ; 60,147 उमेदवार सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्र

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) यूजीसी-नेट डिसेंबर 2019 परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यामध्ये 60,147 उमेदवार सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्र ठरले आहेत. तर ज्युनिअर रिसर्च फेलोशिपसाठी  5,092 उमेदवारांची निवड झाली आहे.

एनटीएने 2 आणि 6 डिसेंबर रोजी दोन शिफ्टमध्ये यूजीसी-नेटची परीक्षा घेतली होती. देशभरातील 219 शहरांमध्ये 700 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली होती. एकूण 81 विषयांची चाचणी घेण्यात आली असून त्यासाठी 10.34 लाख उमेदवारांनी नोंदणी केली. त्यापैकी 7.93 लाख उमेदवार परीक्षेस बसले होते.

उमेदवारांचे ओझे कमी करण्यासाठी यावेळेस संगणक-आधारित परीक्षा घेण्यात आली असून 1,450 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांद्वारे परीक्षेचे परीक्षण केले गेले. मोबाइल नेटवर्क आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांद्वारे चोरी रोखण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर जॅमर बसविण्यात आले होते.

_—-__

हे पण वाचा -
1 of 337

अधिक माहितीसाठी – http://www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

✉ official.careernama@gmail.com

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: