UGC NET 2023 Results : UGC NET 2023 परीक्षेचा निकाल लवकरच होणार जाहीर; असा चेक करा निकाल

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA लवकरच (UGC NET 2023 Results) परीक्षेचा निकाल जाहीर करु शकते. या परीक्षेला बसलेले उमेदवार निकाल जाहीर झाल्यानंतर UGC NET ची अधिकृत वेबसाईट ugcnet.nta.nic.in  वर जाऊन त्यांचा निकाल पाहू शकतात. UGC NET परीक्षा 5 टप्प्यात घेण्यात आली होती. ही परीक्षा 15 मार्च 2023 रोजी संपली. UGC NET निकालासोबत NTA, UGC NET Answer Key आणि UGC NET कट-ऑफ मार्क्स देखील जारी करणार आहे.
UGC NET 2023 ची परीक्षा देशभरातील अनेक केंद्रांवर यशस्वीपणे पार पडली. UGC NET परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार भारतभरातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये असिस्टंट प्रोफेसर आणि कनिष्ठ संशोधन फेलोशिप (JRF) पदांसाठी पात्र असतील.

असा चेक करा निकाल – (UGC NET 2023 Results)

  1. UGC NET च्या अधिकृत वेबसाईट ugcnet.nta.nic.in वर भेट द्या.
  2. होमपेजवर NTA UGC NET निकाल 2023 लिंक शोधा आणि त्यावर क्लिक करा.
  3. स्क्रीनवर एक नवीन लॉगिन पृष्ठ दिसेल.
  4. लॉग इन करण्यासाठी सर्व आवश्यक तपशील जसे की रोल नंबर, जन्मतारीख किंवा नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा.
  5. तुमचा UGC NET निकाल 2023 स्क्रीनवर दिसेल. (UGC NET 2023 Results)
  6. UGC NET निकाल 2023 तपासा आणि पुढील वापरासाठी सेव्ह करा.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com