मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय- २६ जानेवारीपासून शाळेत होणार संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन

करिअरनामा । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. 26 जानेवारीपासून प्रत्येक शाळेत  संविधानाच्या उद्देशिकेचे समूह वाचन घेण्यात येणार आहे.

राज्यातल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे. तसेच  परिपाठातले इतर विषय वगळण्यात आले आहेत. शाळकरी विद्यार्थ्यांच्या मनात संविधानाची तत्वे रुजवण्याची गरज आहे. त्यासाठीच सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये दररोज परिपाठ घेतला जातो. या परिपाठातले विषय शाळा ठरवत असते. आता 26 जानेवारीपासून शाळेच्या परिपाठाच्या वेळी संविधानाच्या उद्देशिकेचे समूह वाचन घेण्यात येणार आहे. संविधानातील स्वातंत्र, समता आणि बंधुता या मुल्यांची रुजवण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याच सांगण्यात आलं आहे.

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी आमच्या www.careernama.com या वेबसाईटला लाईक करा. तसेच नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.