तलाठी पदभरतीचा मार्ग मोकळा, 8 जिल्ह्यांतील तलाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार.

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याची भरती प्रक्रिया २०१९ मध्ये राबविण्यात आली होती. यापूर्वी २६ जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती.  तर  औरंगाबाद, नांदेड, बीड,  नंदुरबार, धुळे, अहमदनगर सोलापूर व सातारा या जिल्ह्यात तलाठी पदभरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना वित्त विभागाने ४ मे २०२०  रोजीच्या शासन निर्णयानुसार पदभरतीवर निर्बंध घातले होते. Talathi Bharti 2021

वित्त विभागाने तलाठी पदभरतीवरील आता निर्बंध उठवले आहे आणि तलाठी भरतीसाठी मान्यता दिली आहे. त्यांच्या मान्यतेने उर्वरित ८ जिल्ह्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या संदर्भात वेगळी भूमिका घेणे उचित होणार नाही. म्हणूनच बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा,  धुळे आणि अहमदनगर या आठ जिल्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या तलाठी पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. या जिल्ह्यातील निवड झालेल्या उमेदवारांचे नियुक्ती आदेश निर्गमित करण्यास विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली. Talathi Bharti 2021

पदभरतीची कार्यवाही ९ सप्टेंबर २०२० रोजी  पूर्ण करण्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी यांना कळविण्यात आले होते. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने ९ सप्टेंबर रोजी आदेश पारीत करुन एस.ई.बी.सी. आरक्षणास स्थगिती दिलेली आहे. त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्हा पेसाक्षेत्राखाली असल्याने नंदुरबार जिल्हाधिकारी यांनी १६ नोव्हेंबरला नियुक्ती आदेश पारीत करण्यात आले तसेच 8 जिल्ह्यांसाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरू होईल असल्याचेही थोरात यांनी सांगितले.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com