सर्वोच्च न्यायालयात अनुवादक पदाच्या 30 जागांसाठी भरती जाहीर; पगार 44 हजार रुपये

नवी दिल्लीः  सर्वोच्च न्यायालयात कोर्टाने सहाय्यक/कनिष्ठ अनुवादकांच्या रिक्त पदांवर भरती प्रक्रिया सुरू केलीय. आपल्याकडे न्यायालयाने सांगितलेल्या भाषेचे चांगले ज्ञान आणि अभ्यास असेल तर, देशातील सर्वोच्च न्यायालयात काम करण्याची चांगली संधी आहे. या पदांवर नियुक्ती मिळविण्यासाठी लेखी परीक्षा आणि मुलाखतीत या परीक्षेच्या दोन पातळी आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचे इंग्रजीत भाषांतर करण्याचे काम असेल. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या संदर्भातील आवश्यक माहिती पुढे देण्यात आली आहे.

पदाचे नाव कोर्टात सहाय्यक (कनिष्ठ अनुवादक) असून पदांची संख्या ही 30 आहे. सदर पदाची वेतनश्रेणी ही दरमहा 44000 रुपये (लेव्हल-7 प्रमाणे इतर भत्ते यासह पगार) असून, इंग्रजी ते हिंदी (05), आसामी (02), बंगाली (02), तेलगू (02), गुजराती (02), उर्दू (02), मराठी (02), तमीळ (02), कन्नड (02), मल्याळम (02), मणिपुरी (02), उडिया (02), पंजाबी (02), नेपाळी (01) अशा जागा रिक्त आहेत.

आवश्यक पात्रता ही इंग्रजी आणि संबंधित भाषेमध्ये पदवी असावी. अनुवादाचा डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम केलेला असावा. या पदांसाठी 18 ते 30 वर्षे ही वयोमर्यादा निश्चित करण्यात आलीय. सोबतच, केंद्र सरकारच्या नियमांनुसार कमाल वयोमर्यादा शिथिल केली जाणार आहे. एससी कोर्ट सहाय्यक रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. 15 फेब्रुवारी 2021 पासून 13 मार्च 2021 पर्यंत अर्ज करू शकता. सामान्य आणि ओबीसी प्रवर्गासाठी अर्ज फी 500 रुपये आहे. एससी, एसटी, दिव्यांग आणि माजी सैनिकांसाठी 250 रुपये एवढी फी आहे.

मूळ जाहिरात – PDF

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा – https://jobapply.in/Sc2020Translator/

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 मार्च 2021