सुंदर पिचाई यांनी सांगितली आपली कथा, वडिलांच्या एका वर्षाच्या पगारातून खरेदी केले होते अमेरिकेचे तिकीट

करिअरनामा  ऑनलाईन। भारतीय वंशाचे सुंदर पिचाई यांना जग गुगलचे सीईओ म्हणून ओळखते. नुकतेच एका व्हर्च्युअल ग्रॅज्युएशन समारंभात आशा न सोडण्याचा सल्ला दिला आहे. यावेळी त्यांनी आपल्या संघर्षाच्या दिवसांबद्दल ही सांगितले.”Dear Class of 2020″  या नावाने हा कार्यक्रम युट्युब वर लाईव्ह करण्यात आला होता. यामध्ये काही लीडर्स, स्पीकर्स, सेलेब्रिटी आणि युट्युब क्रिएटर्स यांना देखील सामील करण्यात आले होते. रविवारी झालेल्या या कार्यक्रमात त्यांनी टेक्नॉलॉजीशी संबंधित अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला हताश आणि अधीर बनवितात असे सांगितले. या अधिरतेला कधीच संपू दिले नाही पाहिजे असेही त्यांनी सांगितले. याच तंत्रज्ञानाच्या दुनियेत पुढची क्रांती होणार आहे आणि तुम्ही अशा गोष्टी बनवाल ज्या माझ्या पिढीचे लोक विचारही करू शकत नाहीत. असे ते म्हणाले. 

आपल्या संबोधनात पिचाई यांनी आपल्या संघर्षांच्या दिवसांबद्दल सांगताना वयाच्या २७ व्या वर्षी भारत सोडून ते स्टॅनफोर्ड विद्यापीठात शिकायला आलो होतो असे सांगितले. त्यांनी सांगितले, ‘मी माझ्या शिक्षणासाठी स्टॅनफोर्ड विद्यापीठात जाऊ शकावे म्हणून माझ्या वडिलांनी एका वर्षाच्या कमाई इतकी रक्कम माझ्या तिकिटावर खर्च खर्च केली होती. विमानात प्रवास करण्याचा माझा पहिला अनुभव होता. कॅलिफोर्निया मध्ये लँड झाल्यावर जसा विचार केला होता तशी परिस्थिती नव्हती.’ अमेरिका खूप महाग देश होता. भारतात एका मिनिटाच्या कॉल साठी २ डॉलर खर्च करावे लागत होते. अमेरिकेत आल्यावर माझे आयुष्य पूर्ण बदलून जाईल असा मी अजिबात विचार केला नव्हता असे त्यांनी सांगितले. 

जगातील सर्वात मोठ्या कंपनीच्या सीईओ ने सांगितले, मला इथपर्यंत माझे नशीब घेऊन आले आहे. मला टेक्नॉलॉजीचे वेड होते. आणि मी हुशार ही होतो.’ त्यांचे शिक्षण तामिळनाडूतील चेन्नई मध्ये झाले आहे. चेन्नई आयआयटी मधून शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठात मास्टर्स केले आणि व्हॉर्टन स्कूल मधून एमबीए केले. २००४ मध्ये त्यांनी गुगलमध्ये नोकरी सुरु केली होती. तेव्हा ते गूगल टूलबार आणि गूगल क्रोम च्या लीड डेव्हलपमेंट टीम मध्ये होते. आज ते गुगलचे सीईओ आहेत.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com